एक्स्प्लोर

Pitru Paksha 2024 : आज सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?

Sarva Pitri Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होत आहे. आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पित्र करावे की नाही? जाणून घ्या.

Sarva Pitri Amavasya 2024 : हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला (Sarva Pitri Amavasya 2024) विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसते, असे लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध घालतात. ज्यांना 16 दिवसांच्या पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध घालता आलं नाही, असे लोक देखील  र्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालतात. यंदा सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे, याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पित्र करावे की नाही? जाणून घेऊया.

यंदा पितृ पक्षावर सूर्यग्रहणाचं सावट

यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट आहे. यात 17 सप्टेंबरला चंद्रग्रहण होऊन गेलं, तर 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही.

सूर्यग्रहणाचा भारतावर परिणाम नाही, पित्र करता येतील

शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे याचा सूतक काळ देखील भारतात मान्य होणार नाही. तसेच, या दिवशी व्यक्तीद्वारा करण्यात आलेले कर्म धर्म आणि शुभ कार्याचा कोणताच दोष लागणार नाही. तर, व्यक्तीद्वारा करण्यात आलेल्या धर्म कर्म आणि शुभ कार्याचे शुभ फळ प्राप्त होईल. त्यामुळे या काळात तुम्ही पित्र करू शकतात.

सूर्यग्रहणाची वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 9.13 पासून सुरू होणार आहे. हे सूर्य ग्रहण 3 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, सूतक काळाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.13 वाजता सुरु होईल. 2024 चं हे सूर्य ग्रहण भारताच्या वेळेनुसार, रात्रीच्या वेळी होणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. 

सर्वपित्री अमावस्या तिथी आणि मुहूर्त (Sarva Pitri Amavasya 2024 Date)

पंचांगानुसार, भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी, म्हणजे सर्वपित्री अमावस्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 09 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल. तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने मान्यतेनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केलं जाईल. श्राद्ध विधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 August 2026: आजचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Hindu Religion : देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget