(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला व्होट जिहाद झाल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचं वक्तव्य केलंय... मात्र त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. लव्ह जिहाद आणि व्होट जिहादवरून विरोधकांनी फडणवीसांवर जोरदार पलटवारही केलाय. पण विधानसभेच्या तोंडावर राजकारणाचा धर्म की धर्माचं राजकारण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय... पाहूयात...
निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'?
आधी लव्ह जिहाद, मग व्होट जिहाद कोण म्हणालं?
विरोधकांचे 'जिहाद' वक्तव्यावरुन काय आरोप?
निवडणुकीच्या तोंडावर कोणता मुद्दा चर्चेत?
महायुतीची निवडणुकीआधीची रणनीती काय?
राम मंदिराचं उद्घाटन करूनही लोकसभेला
धक्का बसलेली महायुती विधानसभेसाठी
कंबर कसून मैदानात उतरलीय... एकीकडे
उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे सर्व
नेते सर्व शक्ती पणाला लावून पुन्हा एकगठ्ठा मते
मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत...
तर महायुती हिंदूंच्या मतांची बेगमी करण्याच्या
प्रयत्नात आहे... पण खरंतर हे करताना
त्यांच्यासोबत धर्मनिरपेक्षतेचा वारंवार उच्चार
करणारा अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा आहे...
दादांना प्रखर हिंदुत्वाचा हा हुंकार
सहन होण्याची शक्यता नाही...
त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेंची शिवसेना
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वातावरण तापवत असताना दादा काय
करणार, हा प्रश्न आहे...
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई