पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
जानकी देवी बजाज इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऑडिटोरियम येथे ह्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं आहे
भोपाळ : पुणे शहराला मोठा वारसा आणि ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार हे पुणे शहर आहे. त्यामुळेच, पुण्यात भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते या 21 एकरवर ऐतिहासिक शिवसृष्टीचे लोकार्पण होत आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेचे राष्ट्रीय संमेलन पुण्यात मंगळवारी होत आहे. त्यामध्ये, "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे जन-कल्याणकारी सुशासन' या विषयावर हे चर्चासत्र होत आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्याहस्ते पुण्यातील शिव-सृष्टि पार्कचे लोकर्पणही केले जाणार आहे.
जानकी देवी बजाज इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऑडिटोरियम येथे ह्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय चर्चेत राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. येथील कार्यक्रमात संध्याकाळी व्याख्यान सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पद्मश्री पुरस्कारप्राप्त निवेदिता ताई भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय. स्वामी विवेकानंद केन्द्र कन्याकुमारी संस्थेच्या त्या उपाध्यक्षा आहेत. तर, व्याख्यान सत्राचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठित लेखक आणि चरित्रकार डॉ. देवीदास पोटे भूषवणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रातील समरोप सत्रामध्ये नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई च्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव उपस्तितांना संबोधित करतील.
‘शिव-सृष्टि’ थीम पार्कचे लोकार्पण
मुख्यमंत्री डॉ. यादव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे आशियातील एकमेव ऐतिहासिक थीम पार्क ‘शिव-सृष्टि’ ची सफर करुन त्याचे लोकार्पण देखील करणा आहेत. महाराजा शिव-छत्रपति प्रतिष्ठान ट्रस्ट द्वारा संचालित ‘शिव-सृष्टि’ थीम पार्कचे उद्देश्य छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षशाली इतिहासाला तेवत ठेवणे, प्रेरणास्त्रोत बनवणे हा आहे. ‘शिव-सृष्टि’ थीम पार्क 21 एकर जागेवर उभारण्यात आली आहे. या शिवसृष्टीसाठी अंदाजे 438 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च आला आहे. आत्तापर्यंत या मेगा प्रोजेक्टसाठी दोन टप्प्यात काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सरकारवाडा अंतर्गत महाराष्ट्रातील किल्ल्याचे प्रदर्शन, छत्रपति शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटकेची गोष्ट, रायगडचा 5डी-शो, शस्त्रांचे प्रदर्शन आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत इतर इंटरॅक्टिव अनुभव यांची सहभाग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रोटेशनल प्लेटफार्ममध्ये ‘स्वराज्य, स्व-धर्म, स्व-भाषा’ शो विकसित करण्यात आला आहे, जो एकाचवेळी 100 लोकं पाहू शकतील. तिसऱ्या टप्प्यात प्रवेश द्वार (रंग मंडळ), राजसभेचे निर्माण, डार्क राइड, तटबंध, लँडस्केप आणि ऑडिटोरियमचे निर्माण पूर्ण केले जाईल. या थीम पार्कला ‘मेगा टूरिझम प्रोजेक्ट’ चा दर्जा देण्यात आलाय. आत्तापर्यंत, 70 हज़ारांपेक्षा जास्त नागरिकांनी या शिवसृष्टी थीम पार्कची भ्रमंती केली आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स