एक्स्प्लोर

Kalyan : हत्या झालेल्या मोटरमनच्या जखमी पत्नीचा अखेर मृत्यू, हत्येचा बनाव रचणारा मुलगा अद्याप रुग्णालयात

पोलिसांनी आता आई आणि वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलगा लोकेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातून सुटताच त्याला अटक केली जाणार आहे. 

ठाणे : कल्याणामध्ये हत्या झालेल्या मोटरमनच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा लोकेश बनोरिया हा जखमी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालयातून त्याला सोडताच आई आणि वडिलांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक केली जाईल अशी माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

कल्याणच्या चिकनघर परिसरात निखिल हाईट्समध्ये सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरिया, पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश राहत होते. या सोसायटीतील रहिवाशांनी रविवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना फोनद्वारे बनोरिया कुटुंबातील दोन व्यक्ती जखमी आणि एक जण मृत अवस्थेत असल्याची माहिती दिली.  महात्मा फुले चौक पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असता त्यांना प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तर प्रमोद यांची पत्नी  कुसुम व मुलगा लोकेश हा जखमी अवस्थेत आढळून आला. 

सुरुवातीला लोकेशने वडिलांनी आम्हा दोघांना जखमी केले, त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवून टाकले असा बनाव केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. मात्र पोलिसांना या प्रकरणी संशय होता. पोलिसांनी लोकेशची अधिक चौकशी केली असता, प्रमोद व त्यांचा मुलगा लोकेश या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती मिळाली. 12 डिसेंबर रोजी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली.

याच दरम्यान, प्रमोद यांना वाचविण्यासाठी मधे पडलेल्या प्रमोद यांची पत्नी  आणि लोकेशची आई कुसुमवर देखील त्याने वार केले. तिला देखील जखमी केले. यानंतर स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी व आईवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी लोकेश विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, लोकेश व आई कुसुम हे  दोघे जखमी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र लोकेशची आई कुसुम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पोलिसांनी आता आई आणि वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलगा लोकेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच जखमी लोकेश हा रुग्णालयातून सुटताच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ताTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget