मुलगा की हैवान! वडिलांना संपवलं, आईवरही हल्ला; गुन्हा लपवण्यासाठी स्वत:वर वार
कल्याण पश्चिममध्ये रविवारी एका हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये सेवानिवृत्त मोटरमनने पत्नी आणि मुलाला गंभीररित्या जखमी करत स्वत:चा जीव संपवला अशी बातमी समोर आली होती. पण या घटनेमागे वेगळचं सत्य समोर आलं आहे.
कल्याण : कल्याण पश्चिम याठिकाणी एक खळबळजनक घटना समोर रविवारी समोर आली होती. कल्याणच्या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमनने पत्नी आणि मुलाला गंभीररित्या जखमी करत स्वत:चा जीव संपवला अशी घटना समोर होती. पण पोलिस तपासात वेगळात खुलासा झाला आहे. घटनेत जखमी सापडलेल्या मुलानेच वडिलांची हत्या आणि आईला जखमी करत गुन्हा लपवण्यासाठी स्वत:वरही वार करुन घेतले होते. दरम्यान आरोपी लोकेश आणि त्याच्या जखमी आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणारे मृत प्रमोद बनोरिया यांचा 27 वर्षीय मुलगा लोकेश हा शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद यांना वाचविण्यासाठीमध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी आणि लोकेशची आई कुसुमवर देखील लोकेशने वार केले. त्यानंतर स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरात ठेवत पहाटेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले.
मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याची माहिती दिली. सोसायटीमधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सर्वजण दिसल्याने याप्रकरणी पोलिसांना बोलवण्यात आले. मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत तसेच आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांना लोकेशवर संशय होता.पोलिसांनी तपास सुरू केला. डॉकटर आणि पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारणा केळ्यांनातर तिने मुलाच्या गुन्ह्याबद्दल त्यांना सांगितले. लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू आहे.
संबधित बातमी - पत्नी-मुलाला मारहाण, त्यानंतर संपवलं आयुष्य; खळबळजनक घटनेनं कल्याण हादरलं
- iPhone Smuggling : मुंबई विमानतळावर तस्करी करण्यात येणारे 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त, DRI ची कारवाई
- घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई-वडिलांना मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
- मुंबई विमानतळावर 3.7 कोटी रुपयांचे परकीय चलन बाळगणाऱ्या दोघांना अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha