एक्स्प्लोर

कल्याण रेल्वे यार्डात मजुरावर हल्ला करुन लुटीचा प्रयत्न, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण रेल्वे यार्डात एका मजुरावर धारदार शस्त्राने वार करुन लूटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींना कल्याण जीआरपीने ताब्यात घेतले आहे.

Thieves Attack : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या एका मजुरावर धारदार शस्त्राने वार करुन लूटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना कल्याण रेल्वे यार्डात घडली. याप्रकरणी दोन आरोपींना कल्याण जीआरपीने ताब्यात घेतले आहे. अद्याप तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींमधील एक आरोपी अल्पवयीन असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
 
कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात देवीदास भले हा तरुण शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काम करत होता. यावेळी तीन तरुण त्याच्याजवळ आले. या तिघांनी देवीदास याची जबरदस्तीने झाडाझडती सुरु केली. दरम्यान, देवीदासने जोरदार प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार पाहून हे तिघे आणखीन चिडले. तिघांनी मिळून देवीदासला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी देवीदासने बचावसाठी आरडाओरडा सुरू केला. हे पाहून तिघे पळायला लागले. यातील एकाला काही नागरिकांनी पकडले. त्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. याप्रकणी पोलिसांनी आणखी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपूस केली असता त्याने इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे.


याबाबत पोलीस अधिकारी संपत चव्हाण यांनी सांगितले की, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याची विचारपूस केली असता त्यांनी इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल यांच्या मार्गदर्शनाखआली संपत चव्हाण हे  सध्या तपास करीत आहे. या आरोपींना या आधीही असा काही प्रकार केला आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Robbery : पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Hinjewadi Pune : पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
Beed Accident Case : रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget