पत्नी-मुलाला मारहाण, त्यानंतर संपवलं आयुष्य; खळबळजनक घटनेनं कल्याण हादरलं
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात असणाऱ्या निखिल हाईट्स या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
कल्याण : कल्याण पश्चिम याठिकाणी एक खळबळजनक आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कल्याणच्या एका हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमनने पत्नी आणि मुलाला गंभीररित्या जखमी करत स्वत:चा जीव संपवला आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रमोद बनोरिया असून त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश हे दोघे गंभीर जखमी आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कल्याण पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एका धक्कादायक घटनेबाबत माहिती दिली. घटना कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहचले असता एक तरुण जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या शेजारी एक महिलाही जखमी अवस्थेत होती आणि एका पुरुषाचा मृतदेहही पडलेला होता. सर्व घरात रक्त पसरलं होते. दरम्यान या घटनेबाबत जखमी तरुण लोकेशने खुलासा केला.
आधी मुलगा आणि पत्नीला मारहाण, मग संपवलं स्वत:च जीवन
जखमी अवस्थेत सापडेलेला तरुण लोकेश याने या घटनेबाबत सांगताना त्याचे वडिल मृत प्रमोद यांनी आधी त्याला आणि पत्नी कुसुमला गंभीर जखमी केलं. त्यांनंतर स्वतःला संपवून टाकलं. दरम्यान लोकेशने वॉचमनला फोन करून रुग्णवाहिका पाहिजे असल्याचं सांगितलं. ज्यानंतर वॉचमनला संशय आल्याने त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना सांगितलं. त्या सर्वांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटना स्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सध्यातरी हे सारं कौटुंबिक वादातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण तपास पूर्ण झाल्यावरचं सारं सत्य समोर येणार आहे.
- iPhone Smuggling : मुंबई विमानतळावर तस्करी करण्यात येणारे 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त, DRI ची कारवाई
- घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई-वडिलांना मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
- मुंबई विमानतळावर 3.7 कोटी रुपयांचे परकीय चलन बाळगणाऱ्या दोघांना अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha