एक्स्प्लोर
मुंबईतला कचरा साफ करण्यासाठी राबवणार इंदौर मॉडेल
शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या शहराचा दौरा करून तेथील स्वच्छतेचे मॉडेल आता मुंबईतही राबवावे, असा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. त्यासाठी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा देखील सोमवारी (10 फेब्रुवारी) बोलवली गेली.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी स्वखर्चानं इंदौर दौरा करुन तेथील स्वचछतेच्या मॉडेलचा अभ्यास केला. आता हेच मॉडेल मुंबईत राबवण्यासंदर्भात शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी आहे. तसेच मुंबई आणि इंदौर शहरांमध्ये सर्वच बाबतीत मोठा फरक असल्याचे सांगत मुंबईचा अभ्यास करून त्याप्रकारचे मॉडेल राबवणं गरजेचे असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.
एकीकडं जगातील अनेक मोठी शहरे स्वच्छतेच्या बाबतीत पुढे गेली असताना मुंबईत मात्र कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमकं कुठलं मॉडेल वापरायचं यावरुनच अजूनही काथ्याकूट सुरू आहे. आता तर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना शहर स्वच्छतेसाठी मध्य प्रदेशातील इंदौर मॉडेल राबवण्याच्या प्रेमात पडली आहे. सुका ओला कचरा वर्गीकरण करण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत इंदौर महापालिकेने जे मॉडेल राबवले आहे, त्यामुळे हे शहर स्वच्छ राहत असून यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या शहराचा दौरा करून तेथील स्वच्छतेचे मॉडेल आता मुंबईतही राबवावे, असा आग्रह प्रशासनाकडे धरला आहे. त्यासाठी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा देखील सोमवारी (10 फेब्रुवारी) बोलवली गेली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपच्या नगरसेवकांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले. तसंच मुंबई आणि इंदौर शहरांमध्ये सर्वच बाबतीत मोठा फरक असल्याचे सांगत मुंबईचा अभ्यास करून त्याप्रकारचे मॉडेल राबवणं गरजेचे असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.
BMC Tax | मुंबईकरांना भविष्यात 'कचरा टॅक्स' भरावा लागणार, बीएमसीच्या अर्थसंकल्पात सूतोवाच | ABP Majha
मुंबई महापालिकेकडून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी लागू करण्यात आली आहे. मालमत्ता कराची वसूलीही धोरण रखडल्यामुळे रखडली आहे. तसेच जीएसटी प्रणालीमुळे जकातीतून मिळणारे महापालिकेचे उत्पन्नही बंद झालं आहे. त्यामुळे सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीतली आवक सध्या थंडावली आहे. म्हणूनच, उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून उत्पन्नाचे दुसरे पर्याय शोधले जात आहेत. म्हणूनच येत्या काळात महापालिका मुंबईकरांकडून कचरा, मलजल आणि इतर सेवांसाठीचे अतिरिक्त सेवाशुल्क वसूल करु शकते. मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात येत्या काळात मुंबईकरांवर कचरा टॅक्स लावला जाण्याबाबत सूतोवाच करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईकरांवर 'कचरा टॅक्स'; घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यासाठी पैसे मोजावे लागणार
महिला अत्याचारासंबंधी खटल्यांसाठी महाराष्ट्रात 138 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement