(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Protest in Mumbai : मुंबईत काँग्रेस-भाजप आमने सामने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
Congress Protest in Mumbai : मुंबईतील मुलुंड येथील भाजप कार्यालयावर काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
Congress Protest in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईतील मुलुंड येथील भाजप कार्यालयावर काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. परंतु, काँग्रेसच्या या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुलुंड येथील भाजपच्या कार्यालयासमोर जमा झाले आहेत. दोन्ही पक्ष आमने-सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आक्रमक होत असल्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
"मोदी माफी मांगो" अशा घोषणा देत, आज मुंबई काँग्रेसने चौथे आंदोलन मुलुंड येथे केले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालया बाहेर हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसकडून या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस सरचिटणीस चरणसिंग सप्रा आणि चंद्रकांत हंडोरे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत 200 ते 300 काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आंदोलन करत होते.
भाजपकडून देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सकाळपासूनच शक्तीप्रदर्शन करण्यात येत होते. मनोज कोटक यांच्या कार्यालयासमोर भाजपाचे तीनशे ते चारशे कार्यकर्ते जमले होते. आमदार राम कदम आणि भाजप नगरसेवक देखील होते. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणा देत, नाना पटोले यांच्या प्रतिमा जाळल्या. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झटापट होणार हे लक्षात घेऊन आधीच बंदोबस्त लावला होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना दोन वेगवेगळ्या रस्त्यांवर अडवण्यात आले आणि संभाव्य गोंधळ टाळला गेला.
मनोज कोटक यांनी प्रतिक्रिया देत संसदेची लढाई संसदेत लढावी, तिथे काँग्रेसचा केवळ एकच खासदार महाराष्ट्रातून आहे, त्यामुळे मुंबईतील लोकांची गैरसोय करू नये, असे म्हटले. तर भाई जगताप यांनी त्यांना प्रत्युत्तर देत, ज्या लोकांनी, ज्या विभागातून कोटक यांना निवडून दिले आहे, त्याच विभागात आम्ही आंदोलन करणार असे सांगत, येणाऱ्या काळात अशी अनेक आंदोलने करणार असल्याचे देखील जाहीर केले.
भाई जगताप यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि खासदार मनोज कोटक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईचा अपमान होत असताना कोटक कोठे होते? सात वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, या कालावधीत मुलुंडसाठी त्यांनी केलेले एक काम सांगा असे आव्हान भाई जगताप यांनी यावेळी केले.
खासदार कोटक यांनी दिलेल्या इशाऱ्यावर भाई जगताप म्हणाले, "आम्ही शांतताप्रिय आणि गांधी विचारांचे आहोत. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार आमचं असलं तरी आम्ही शांतता राखू, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यामुळे आम्हाला कोटक यांना याबाबत निवेदन द्यायचं आहे. त्यामुळे निवेदन देऊनच आम्ही परत जाऊ.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- '...अन्यथा लक्षात ठेवा 3 कोटी धगनर बांधवांशी गाठ!' गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात; तर महापालिकेचे पथक राणेंच्या जुहूमधील बंगल्यावर