Chinese Loan Application : चायनीज लोन अॅप्लिकेशन प्रकरणी ED ची मुंबईत छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त
चायनीज लोन अॅप्लिकेशन (Chinese loan apps) प्रकरणी ED ने मुंबईत छापेमारी केली आहे. मुंबईत चार ते पाच ठिकाणी छापेमारी केली आहे.
Chinese Loan Application : चायनीज लोन अॅप्लिकेशन (Chinese loan apps) प्रकरणी ED ने मुंबईत छापेमारी केली आहे. मुंबईत चार ते पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. PayTM, Razorpay आणि Cashfree या पेमेंट गेटवेशी संबंधित अॅपवर छापे टाकले आहेत. यामध्ये पेटीएम अकाउंट फ्रिज करण्यात आलं आहे. या छापेमारीमध्ये तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आलं असून आरोपी हे पैसे त्यांच्या पेटीएम अकाउंटमध्ये ठेवायचे. चायनीज लोन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या मनी लॉंड्रिंगचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, बंगळुरुमधील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक एफआयआर संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. लोकांनी मोबाईल अॅप्सद्वारे काही कंपन्यांकडून किंवा व्यक्तींकडून अल्प रकमेचे कर्ज घेतले होते. ज्यानंतर त्यांना त्रासाला बळी पडावे लागले. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर ईडीने या प्रकरणी शोधमोहीम राबवली आहे. नोंदणी नसलेल्या आणि बनावट अॅप्सद्वारे डिजिटल कर्ज देण्याचा ट्रेंड मोठा चिंतेचा विषय बनला असून आरबीआयनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
भारतीयांची बनावट कागदपत्रे वापरुन पैसा कमवण्याचे काम
या संस्था चिनी व्यक्तींद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. या संस्था भारतीयांची बनावट कागदपत्रे वापरुन आणि त्यांना त्या संस्थांचे डमी संचालक बनवून पैसे कमवत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अॅप कथितरित्या चिनी मालकीच्या कंपन्यांद्वारे अनधिकृतपणे चालवल्या जाणार्या कर्ज अॅप्सवरील व्यवहार सुलभ करतात. चीनी अॅपवर व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. यातील काही कंपन्या बेकायदेशीर सट्टेबाजीत गुंतल्याचेही बोलले जात आहे.
नेमकं प्रकरण काय
चायनीज अॅपद्वारे चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले जात होते. या प्रकरणाचा तपास आता ईडीकडून केला जात आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि त्यांच्या फिनटेक भागीदारांनी आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून कर्ज देण्याच्या चुकीच्या पद्धतींचा अवलंब केला आहे. चौकशी सुरु झाल्यानंतर, यापैकी बर्याच कंपन्यांनी व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर क्रिप्टोकरन्सी मालमत्ता खरेदी करण्यासाठी फिनटेक कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात निधी वळवला. हाच निधी नंतर परदेशात वळवला गेला असा आरोपही ईडीने केला आहे.
चीनी नागरिकांनी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट आणि भारतीय संचालकांच्या मदतीने अनेक भारतीय कंपन्या सुरु केल्या. नंतर कथितरित्या चीनी नागरिकांनी भारतात प्रवास करुन संचालकपद ताब्यात घेतले. या कंपन्यांनी काही स्थानिकांना कामावर घेतले होते आणि HSBC बँकेत बँक खाती उघडण्यासाठी आणि PayTM, Cashfree, Razorpay इत्यादी ऑनलाइन वॉलेटसह व्यापार खाती उघडण्यासाठी वापरण्यात आले होते. या ऑनलाइन वॉलेटमध्ये ढिलाई यंत्रणा होती आणि त्यांच्या संशयास्पद व्यवहारांची नियामक अधिकाऱ्यांना तक्रार न केल्याने मदत झाल्याची माहिती ईडीनं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: