एक्स्प्लोर

Farmers Protest | पवारसाहेब देशाचे जवान- पोलिसांच्या बाजूनं तुम्ही का बोलला नाहीत, आशिष शेलारांचा सवाल

'ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?'

मुंबई : दिल्लीत (Delhi Farmers Protest) सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच मंगळवारी एक वेगळं वळण मिळालं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये एकच हिंसा उसळली आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणांशी शेतकऱ्यांचा संघर्ष पाहून सारा देश हादरला. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून काही प्रश्नही केले.

महाविकासआघाडीवर निशाणा साधत शेलार म्हणाले, दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही. 'महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम- शरद पवार

वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?

रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली आंदोलन हिंसाचाराच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं, मग देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलला नाहीत?, अशा शब्दांत शेलारांनी राऊतांवर निशाणा साधला.

शरद पवारांनी फेसबुक पोस्ट का केली नाही?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत शेतकरी आंदोलनासंदर्भत केंद्राला गंभीर इशाराही दिला. शिवाय आपण या घटनेचं समर्थन करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण, शेलारांनी त्यांच्या भूमिकेवरही नाराजीचाच सूर आळवला.

'कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार. दिल्ली आंदोलनातील हिंसाचाराच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही? पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट देशाचे जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही? आंदोलनात जो वाद पहिल्यापासून सुरु आहे त्याचं समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली? असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले. सोबतच सदर प्रकरणी चौकशी होणं अतिशय गरजेचं असून, षडयंत्र रचणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे यासाठी ते आग्रही असल्याचं पाहायला मिळालं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025Disha Salian case : वडिलांच्या अफेअरने त्रस्त, दिशा सालियनने आर्थिक तणावातून जीवन संपवलं, नवीन माहिती समोरABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
IPL 2025 SRH Vs LSG: केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Embed widget