सोशल डिस्टन्सिंगचं चांगभलं! बँकांना तीन दिवस सुट्या, खातेदारांच्या रांगा
उद्यापासून बँकांना सलग तीन दिवस सुट्या असल्याने लोकांनी बँकांसमोर रांगा लावल्या आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा यामुळे फज्जा उडाला. अशा कोरोनाचा संसर्ग वेगाने होण्याची भीती निर्माण झालीय.
धुळे : उद्यापासून बँकांना तीन दिवस सलग सुट्टी असल्यानं बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या बँकांबाहेर रांगा लागल्या आहेत. उद्या शुक्रवार म्हणजे 10 एप्रिल गुड फ्रायडे, शनिवार 11 एप्रिल (महिन्याचा दुसरा शनिवार), रविवार 12 एप्रिल, असे तीन दिवस बँकांना सुट्टी आहे. या सगल आलेल्या सुट्ट्यामुळे बँकेबाहेर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. राज्यात कोरोनाचं संकट घोंगावत असताना बाहेर अशी गर्दी करणे सर्वांच्याच धोक्याचे आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर केलं. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी याचं पालन होताना दिसत नाही.
धुळे जिल्ह्यात शहरी भाग, ग्रामीण भागात हे चित्र दिसून आलं. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत कोणतीही दक्षता घेतलेली नव्हती. परिणामी नागरिकांच्या या बेजबाबदारपणाचा इतरांना आरोग्यदृष्ट्या त्रास होण्याची भीती निर्माण झाली आहे. बँकांबाहेर नागरिकांची झालेली गर्दी कमी करण्याचं बँकांपुढे मोठं आव्हान उभं ठाकलंय. लॉकडाऊनच्या काळात बँकेच्या कामाचा बहाणा करून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीसी प्रसाद मिळत आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी गुड फ्रायडे शनिवार 11 एप्रिल (महिन्याचा दुसरा शनिवार), रविवार 12 एप्रिल, असे तीन दिवस बँकांना सुट्टी आहे. तर 13 एप्रिलला बँका सुरू राहणार आहेत. मंगळवार 14 एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बँकांना पुन्हा सुट्टी राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
सोशल डिस्टन्स चिंतेचा विषय कोरोना विषाणूचा प्रसार आता खेड्यातही दिसू लागला आहे. याची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे फार आवश्यक आहे. मात्र, नागरिकांकडून अनेक ठिकाणी प्रशासनाला सहकार्य होताना दिसत नाही. परिणामी अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी भाजीमंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची हॉटस्पॉट असलेली ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित मुंबईत असल्याने शहरातील अनेक भाग अशा प्रकारे सील करण्यात आले आहेत. तर, पुणे शहरातीलही अनेक भाग कोरोनामुळे सील करण्यात आले आहेत.
औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार
राज्यात कोरोनाबाधित वाढले राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. आज दुपारपर्यंत कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण सापडले आहेत. आताच्या घडीला राज्यात बाराशेहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एकट्या मुंबईत सातशेच्या आसापास कोरोनाग्रस्त आहेत. मुंबई हा दाट वस्तीचा प्रदेश असल्याने सरकारसाठी चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे होणारा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
Coronavirus | APMC Market | नवी मुंबई एपीएमसीतील कांदा, बटाटा मार्केट सोमवारपासून बंद