एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार
कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचे योगदानही लक्षणीय आहे. मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण होत असल्याचे समोर आलं आहे.
![औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार six people Beating the police in Aurangabad 3 arrested औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/09204249/ABAD_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही काही लोक आदेश न जुमानता बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. अशातच आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना सहा गुंडांनी पोलिसांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. औरंगाबादमध्ये संचारबंदी असताना बाहेर फिरणाऱ्या सहा लोकांना पोलिसांनी हटकले असता त्यांनी पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांची काठी हिसकावून घेऊन दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तिघोजण अद्याप फरार आहेत.
औरंगाबादच्या अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडली. बाहेर बाईक घेऊन फिरणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी विचारणा केली. यावेळी पोलीस आणि आरोपी शेख फारुख, शे.शारुख शे.फारुख, शेख आरबाज शेख शमीम यांच्यासह अन्य तीन जणांची बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या हातातली काठी घेऊन जनार्धन जाधव आणि दैनसिंग झोनवल या पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.
पोलिसांनी ट्रिपलसीट जाणारी एक गाडी थांबवली. आपली गाडी का थांबवली अशी हुज्जत घालत या गुंडांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलवून घेऊन झुंडीने पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांचीच काठी घेऊन या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला .या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .हल्ला केल्यानंतर हे गुंड दुचाकीवरून पसार झाले. यानंतर तिघांना ताब्यात घेतलं आहे.
महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचे योगदानही लक्षणीय आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत करत आहेत. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलिसांकडून हे काम केले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)