एक्स्प्लोर
Advertisement
राऊत वेगळ्या संदर्भाने बोलले, त्यांचा हेतू साफ, आदित्य ठाकरेंकडून संजय राऊतांची पाठराखण
आदित्य ठाकरेंनी पालकमंत्री म्हणून पहिल्यांचा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आज पालकमंत्री म्हणून त्यांनी पहिली बैठक घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांची पाठराखण केली. शिवाय राहुल गांधी यांच्याशी भेटीबाबत देखील भाष्य केले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल वक्तव्य केल्याने चहुबाजूंनी टीकेचे धनी झालेल्या खासदार संजय राऊत यांची पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली आहे. या विषयाबाबत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, या संदर्भात संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वेगळ्या संदर्भाने ते बोलले होते. पत्रकार म्हणून त्यांचे ते निरिक्षण होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच इंदिरा गांधींचा आदर केला आहे. त्यामुळे कुठलाही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. राऊत यांचा हेतू साफ होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आज आदित्य ठाकरेंनी पालकमंत्री म्हणून पहिल्यांचा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज पालकमंत्री म्हणून त्यांनी पहिली बैठक घेतली. ते म्हणाले की, चांगले रस्ते, फुटपाथ आणि कचरा मुक्त करण्यावर भर दिला जाईल. केवळ मुंबईला नाही तर सर्व राज्याला ए प्लस करणार असल्याचे देखील ते म्हणाले.
ते म्हणाले की, कुठल्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. चांगले प्रकल्प पुढे नेले जातील.
राहुल गांधी यांच्याशी भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पहिल्यांदाच राहुल गांधी यांना भेटलो. चांगली आणि मनानं साफ असे ते आहेत. त्यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले. चांगली मैत्री झाली. 45 मिनिटे राजकारणाबरोबरच अ राजकीय चर्चाही खूप झाली. ते म्हणाले की, पर्यावरण विषयासंदर्भात जयराम रमेश यांना भेटलो, त्यांनी चांगले काम केले आहे यामध्ये त्यांच्या टिप्स घेतल्या, असे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांची पाठराखण केली. राऊत साहेब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वेगळ्या संदर्भाने ते बोलले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच इंदिरा गांधींचा आदर केला आहे. त्यामुळे कुठलाही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. त्यांचा हेतू साफ होता, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत करण्यात आलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने आता मात्र माघार घेतली आहे. या वादावरून वातावरणं तापल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत म्हणाले होते की, 'अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना एक पठान नेता होता. इंदिरा गांधीही त्याला पठान नेते म्हणूनच भेटल्या होत्या. तसेच ते म्हणाले की, मी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा आदर करतो. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य मागे देखील घेतले होते. 'मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असं ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ : करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या :
तंगड्या तोडण्याची भाषा इथे चालणार नाही; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
उदयनराजेंकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे जेम्स लेन आणि मुघलांची अवलाद; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
आम्ही राजघराण्यात जन्माला आलो याचे काय पुरावे द्यायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावा मागितल्यावरून राऊतांवर टीकेची झोड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement