एक्स्प्लोर

तंगड्या तोडण्याची भाषा इथे चालणार नाही; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिलं आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात, हे लक्षात ठेवावं.

भाजप नेता जयभगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध केला होता. तसेच भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनादेखील (कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले) त्यास विरोध करण्याचे आवाहन केले होते. परंतु उदयनराजे भोसले यांनी भाजपला सवाल करण्याऐवजी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. उदयनराजेंच्या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत म्हणाले की, हातपाय तोडण्याची भाषा लोकशाहीमध्ये चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची व्यक्तीगत मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार आहे. त्यामुळे सर्वांचा छत्रपती शिवाजी माहाजांवर सर्वांचा अधिकार आहे.

संजय राऊत उदयनराजेंना उद्देशून म्हणाले की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. परंतु तुम्ही हात-पाय तोडण्याची भाषा करु नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कोणी अशी भाषा केली असती तर महाराजांनी त्याचेही हातपाय तोडले असते.

इंदिरा गांधींबाबतच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण संजय राऊत म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीबद्दल मी जे बोललो त्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींवर लोकांनी हल्ला चढवला तेव्हा त्यांच्या बाजूने सामनातून आम्ही लेख छापले आहेत. मी इंदिरा गांधीची भूमिका घेऊन उभा राहिलो आहे. मुंबईत अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं, तेव्हा करीम लालाचं मुंबईत मोठं प्रस्थ होतं. लाला हा मुंबईतल्या पठाणांचा नेता होता. त्यामुळे अनेक नेते लालाला भेटायचे. लालाच्या घरी त्याने अनेक नेत्यांसोबतचे फोटो लावले होते. सरहद गांधी ज्यांना आपण खान अब्दुल गफार खान या नावानेसुद्धा ओळखतो. तेसुद्धा लालासोबत जोडलेले होते. पठाणांच्या समस्या घेऊन लाला इंदिरा गांधी तसेच इतर पंतप्रधानांना भेटला आहे. मुंबईत अनेक नेते त्याला भेटायचे.

 महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, संजय राऊतांचे उदयनराजेंना आव्हान | सातारा | ABP Majha

छत्रपतींच्या वारसदारांनी भाजपतून राजीनामे द्यावेत : संजय राऊत | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Embed widget