एक्स्प्लोर

उदयनराजेंकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे जेम्स लेन आणि मुघलांची अवलाद; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला होता.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्यावरुन सुरू झालेलं राजकारण चांगलच तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकासंदर्भात राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं. मात्र लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात राऊतांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे उदयनराजेंकडे पुरावे आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आपण दाऊदलाही दम दिलाय असा दावाही संजय राऊतांनी या कार्यक्रमात केला आहे.

उदयनराजेंकडे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांना, भाजपनं जेम्स लेन आणि मुघलांच्या अवलादाची उपमा दिली आहे. त्यामुळं उदयनराजेंकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर भाजपनं हल्लाबोल केला आहे. संगमनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं. त्याचसोबत आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाही संजय राऊतांविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शिवरायांच्या वंशजांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाने संजय राऊतांनी उदयनराजेंची माफी मागण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे.

पाहा व्हिडीओ : महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, संजय राऊतांचे उदयनराजेंना आव्हान

संजय राऊतांवर थेट निशाणा साधत आशिष शेलार म्हणाले की, आमच्या बरोबर सत्ता भोगून नवीन निवडणुकांआधी दुसऱ्याबरोबर युती करण्याचा घाट घातला याला भारतीय संस्कृतीत, वैवाहिक जीवनामध्ये व्यभिचार असे म्हणतात. आमच्या बरोबर सत्ता भोगून नवीन निवडणुकांआधी दुसऱ्याबरोबर युती करण्याचा घाट घातला, याला भारतीय संस्कृतीत, वैवाहिक जीवनामध्ये व्यभिचार असे म्हणतात. शिवसेनेने केलेल्या राजकीय व्यभिचार आणि विश्वास घात आता समस्त महाराष्ट्राला सार्वजनिक उलटी करून संजय राऊत यांनी दाखवलेला आहे. व्यभिचाराला सन्मान समजणारे हे कु वृत्तीचे महाराष्ट्र द्रोही आहेत असं आम्ही समजतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'साताऱ्याच्या गादिचा सार्वजनिक अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागायचे असे घृणास्पद प्रश्न केवळ आणि केवळ जेम्स लेनची अवलाद असणार्‍यांनाच पडतात.'

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर राऊत यांना सज्जड दम दिला आहे. आम्ही राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा सवाल करत आम्ही राजघराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हटले आहे. हा वाद त्यांनी सुरू केला आहे. आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. तर संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. यावर बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करली की जनता यांच्यावर आता थुंकेल. यांच्या रक्तातच गद्दारी आहे. म्हणून लोकसभेच्या निकालानंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. शिवसेना एकटी लढली नसती तर 25 जागा पण निवडून आल्या नसत्या याची जाणीव त्यांना होती. म्हणून भाजपसोबत युतीत लढले. म्हणूनच 55 जागांची मजल मारू शकले, असेही ते म्हणाले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितल्याप्रकरणी त्यांनी संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? असा सवाल केला आहे.

पाहा व्हिडीओ : वंशजाचे पुरावे मागणारे जेम्स लेनची औलाद, संजय राऊतांच्या पुराव्यावरील वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, जाणता राजाची बिरुदावली छत्रपतींनाच दिली जाते. दुसऱ्यांवर आक्षेप घेतांना इतरांचे आक्षेपही कबूल केले पाहिजेत. ही दुट्टपी भूमिका आहे. इतर नेत्यांना महाराजांची उपाधी दिली तर त्याचीही चर्चा होणारच. शिव म्हणजे महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नावाबाबत उदयनराजेंची भूमिका अगदी योग्य आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला होता. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावा देखील मागितला.

संबंधित बातम्या : 

आम्ही राजघराण्यात जन्माला आलो याचे काय पुरावे द्यायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावा मागितल्यावरून राऊतांवर टीकेची झोड

मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय, त्याला दम भरलाय : संजय राऊत

'जाणता राजा' उपाधी देणारे रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते : शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget