लाडकी बहिण, भाऊ झालं, आता तृतीयपंथीयांसाठी 'लाडका' योजना आणा, मनसेचं मुख्यमंत्र्यांना दिलसे आवाहन
चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले. तृतीयपंथीय समाजातील दुर्लक्षित -वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून दिली आहे.
![लाडकी बहिण, भाऊ झालं, आता तृतीयपंथीयांसाठी 'लाडका' योजना आणा, मनसेचं मुख्यमंत्र्यांना दिलसे आवाहन Transgender Demand For Ladka Yojna After Ladki Bahin and Ladka Bhau Maharashtra Marathi News लाडकी बहिण, भाऊ झालं, आता तृतीयपंथीयांसाठी 'लाडका' योजना आणा, मनसेचं मुख्यमंत्र्यांना दिलसे आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/22/70767ffbb1db61fc2a9268d92f140d4b172165384546889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : सरकारने गाजावाजा करत अर्थसंकल्पात लाडकी बहिण (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) योजना जाहीर केली.याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येणार आहे. राज्यभरातून या योजनेचे स्वागत केले जात आहे. तसेच लाडका भाऊ योजना आणण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. ही मागणी गांभीर्याने घेत लगेच महिन्याभराच्या आत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आता लाडका भाऊ योजना आणण्यात आली. दरम्यान आता तृतीयपंथीयांकडूनदेखील शिंदे- फडणवीस सरकारकडे 'लाडका'योजनेची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले. तृतीयपंथीय समाजातील दुर्लक्षित -वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून दिली आहे.
चंद्रपुरात आता तृतीयपंथीयांनी देखील सरकारकडे 'लाडका' योजनेची मागणी केली आहे. चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले. तृतीयपंथीय समाजातील दुर्लक्षित-वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून दिली आहे. राज्यात बहिण आणि भावांसाठी सरकारच्या योजना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांनी देखील आवाज उचलला आहे. राज्य सरकारच्या वतीने सध्या जाहीर करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांसाठीच्या योजनांची देखील सुयोग्य अंमलबजावणी होत नसल्याचे मनसेने लक्षात आणून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तृतीयपंथीयांनी लाडका योजना राबवण्यासाठी आग्रह धरला आहे.
तृतीयपंथीयांसाठीसुद्धा महाराष्ट्र सरकारने योजना आणावी
सरकारने लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या तृतीयपंथीयांसाठीसुद्धा महाराष्ट्र सरकारने योजना आणावी. याचा पाठपुरावा आम्ही राज ठाकरेंच्यामार्फत देखील मुख्यमंत्र्यांना करणार आहे. तसेच समाजकल्याण आणि सामाजिक न्याय विभागातर्फे तृतीयपंथी कल्याणकारी योजना राज्य सरकारतर्फे राबवण्यात येते, पण त्याचा लाभ तृतीयपंथीयांना होत नाही. त्याचा लाभ मिळावा आणि त्याची जनजागृती करावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रात तृतीयपंथीयांसाठी कोणतीही योजना नाही
तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रात आजपर्यंत कोणतीही योजना राबवण्यात आलेली नाही. गेल्या 14 वर्षात सरकारकडून कोणत्याही योजना तृतीयपंथीयांसाठी लागू करण्यात आलेली नाही. तृतीयपंथीयांसाठी लवकरात लवकर लवकरच योजना राबवावी, अशी मागणी संबोधन ट्रस्टचे राज काचोळे यांनी केली.
हे ही वाचा :
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)