Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा Top 10 Maharashtra Marathi News maharashtra news smart bulletin 19 august 2022 Friday Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/9ae6a9090995b87e4527801cdce61d26166088620876688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. दोन वर्षांनी गोविंदा ढाक्कुमाकुमवर ठेका धरणार, राज्यभर दहीहंडीचा उत्साह, 10 थर लावून विश्वविक्रम करण्याचा जय जवान पथकाचा निर्धार
देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीची विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
2. गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षणाची घोषणा, दहीहंडीला खेळाचा दर्जा, शिंदे-फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा
3. रायगड बोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएची टीम रायगडमध्ये दाखल, एटीएसही तपास करणार, बोटीचा दहशतवादाशी संबंध नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
4. ठाकरे सरकारनं लागू केलेले सीबीआय तपासावरचे निर्बंध उठण्याची शक्यता, राज्य सरकारच्या अनुमतीशिवाय सीबीआयला तपासाचे अधिकार मिळण्याची चिन्ह
5. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीची नवीन तारीख ठरली, प्रकरण घटनापीठाकडे सोपवणार की नाही याबाबत 22 ऑगस्टला निर्णयाची शक्यता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
6. राष्ट्रवादीच्या 10 बड्या नेत्यांची नाव केंद्रीय यंत्रणांना देणार, सोमय्या आणि कंबोज यांच्यानंतर रणजीत निंबाळकरांचं सूचक वक्तव्य, कागदपत्र तयार असल्याचाही इशारा
7. रस्त्यातील खड्ड्यांमुळे गेल्या सहा महिन्यात 8 हजारांहून अधिक नागरिकांचा बळी, रस्ते मृत्यूचे सापळे बनत असताना सत्ताधाऱ्यांच्या घोषणा हवेत विरल्या
8. राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव, बुलढाण्यात आढळले 9 रुग्ण, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली
9. औरंगाबादमध्ये लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, तरुणाला मैदानी चाचणीदरम्यान चक्कर आली, उपचारादरम्यान करण पवार या तरुणाचा मृत्यू
10. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याच्या घटस्फोटाच्या अफवा, युजवेंद्रची पत्नी धनश्रीनं इस्टाग्राम अकाऊंटवरुन चहल आडनाव काढल्यानं चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)