Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 18 ऑगस्ट 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता... सत्तास्थापनेसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांचा सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न
Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या
अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधक विविध मुद्द्यांवरून होणार आक्रमक
विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक होतील. हीच आक्रमकता सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळेल. सकाळी दहाच्या आधी विरोधकांचं पाय-यांवर ही आंदोलन होणार आहे.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे.
2 . सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलेली क्लीनचिट मुंबई हायकोर्टात प्रलंबित, मोहित कंबोज यांनी चौकशीची मागणी केल्यानं प्रकरण पुन्हा चर्चेत
3. जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, वरळीतील दहीहंडी आयोजनात बाजी मारल्यानंतर आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा तर श्रीराम मिल चौकात शिवसेनेचा दहीहंडी उत्सव
4. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय, एसी लोकल विरोधात प्रवासी संघटना आक्रमक, एसी लोकलमुळे सर्वसामन्यांचा खोळंबा
5. भंडारा-गोंदियासह चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती कायम, वाहतुकीवर परिणाम; राज्यातील अनेक धरणं ओव्हरफ्लो
6. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर, 22 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार
7. भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिला सशक्तीकरण आवश्यक, मोहन भागवत यांचं वक्तव्य
8. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल, २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता, सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलीनला पैसे मिळाल्याचा आरोप
9. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मशिदीत स्फोट, 30 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी, नमाजादरम्यान स्फोट झाल्याची माहिती
10. भारत- झिम्बाब्वेदरम्यान पहिला एकदिवसीय सामना आज, केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
