कोरोनामुळे राज्यातील 3 महापालिकांवर प्रशासक नेमणार; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र
कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
औरंगाबाद महानगपालिकेची मुदत आज म्हणजेच, 28 एप्रिल रोजी संपत असून नवी मुंबई महानगपालिकेची मुदत 7 मेरोजी संपणार आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत 28 जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणं शक्य नाही, त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे
संबंधित बातम्या :
मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आणण्यावरून राजकारण? एकाच पक्षाच्या नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही
औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी
कोरोनाच्या झटपट टेस्टसाठी प्रवरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान; अल्प खर्चात लवकर चाचणी