एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार: केंद्रीय मंत्री नारायण राणे
St Workers Strike : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एसटी संपावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
Narayan Rane on St Workers Strike : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्य सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.
सिंधुदूर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा संप पंधरा दिवस सुरू आहे. जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भयावह परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी आहे. असं असताना राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
राज्य सरकार जर एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेत नसेल तर केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश देऊन या प्रकरणी राज्यपालांना अधिकार द्यावेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना प्रकरणी जो मार्ग काढायचा आहे, त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी चर्चा करेल असेही नारायण राणे यांनी म्हटले. वेळ पडल्यास राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही चर्चा करेल असेही राणे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावर टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार सरकारला आदेश देऊ शकत नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घ्या हे शरद पवारांनी बोललं पाहीजे, सरकारला सांगितल पाहीजे. नुसत अर्थमंत्र्यांना बाजूला बसवून काय फायदा ? त्यामुळे शरद पवार राज्याचा कुठलाच प्रश्न सोडवत नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
ST Strike : एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार?
ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात धक्कादायक दावा
एसटी संप: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, 'या' मुद्यांवर झाली चर्चा