एक्स्प्लोर

Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 

Rajya Sabha Election : काही अदृश्य शक्तीमुळे म्हणा किंवा कोणताही पर्याय उरला नाही म्हणून म्हणा, शरद पवारांचंच नाव पुढे करणं हाच पर्याय महाविकास आघाडीसमोर उरला होता.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जागेवरून महाविकास आघाडीत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या नावावरून ठाकरेंच्याच पक्षात मतभेद उफाळल्याचं दिसून आलं. मात्र शेवटी असे काही चक्रं फिरली की त्यामुळे शरद पवारांच्याच नावाची घोषणा करावी लागली. मात्र त्यामुळे काँग्रेसमधील एक गट आणि आदित्य ठाकरेंच्या नाराजीला उद्धव ठाकरे कसं सामोरं जातात हे पाहावं लागेल.

राज्यसभेच्या राज्यातील सात जागांची निवडणूक जाहीर होताच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. मात्र, महाविकास आघाडीत संघर्ष पेटला तो संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर. शरद पवारांनाच राज्यसभेत पाठवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. आदित्य ठाकरे यांनी मात्र संख्याबळ आणि रोटेशन पॉलिसीचा दाखला देत पक्षाचाच दावा ठोकला. त्यामुळे एका जागेवरून ठाकरेंच्याच पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

Rajya Sabha Seat Dispute : काँग्रेसचाही जागेवर दावा

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसलाही या जागेची गरज होती. त्यामुळे विधान परिषदेत बदल्यात ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला राज्यसभेत पाठवावं, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. दरम्यान, मविआची संयुक्त बैठक न होता प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत होता. समन्वय असल्याचं सांगितलं जात असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुढे करत काँग्रेसने शरद पवार यांच्यावर उघडपणे दबाव टाकण्यास सुरुवात केली.

Political Strategy : सातव्या जागेवर महायुतीची नजर

राजकीय वर्तुळात दोन शक्यता चर्चेत होत्या. पहिली म्हणजे मविआतील गोंधळाचा फायदा घेत महायुती सातव्या जागेवर उमेदवार देऊ शकते. मतांची थोडीफार फूट पडल्यास सातवी जागाही महायुती जिंकू शकते, अशी चर्चा होती.

दुसरी शक्यता म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना करणाऱ्या शरद पवारांनाच डावलून इतर कोणाला राज्यसभेत पाठवल्यास मविआत एकवाक्यता नाही असा संदेश जाईल. त्यामुळे मविआचं राजकीय नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या पार्श्वभूमीवर मविआतील सर्व पक्षांनी शरद पवार यांचंच नाव अंतिम केल्याचं स्पष्ट झालं.

Congress Concern : विलिनीकरणाचा मुद्दा आणि शंका

काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह असा होता की, शरद पवार मविआच्या मतांवर राज्यसभेत गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं आणि ते सत्तेत गेले तर काय? या प्रश्नावर स्पष्ट भूमिका येत नव्हती.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येत विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या काही गटाचं समाधान झालं असलं तरी पूर्ण नाराजी दूर झालेली नाही, असं चित्र आहे.

Uddhav Thackeray Challenge : आदित्य आणि काँग्रेसची संभाव्य नाराजी

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दोन संभाव्य नाराजींचं आव्हान उभं आहे. एक काँग्रेसची आणि दुसरी स्वतःच्या पक्षातील आदित्य ठाकरेंची. गेल्या काही दिवसांत आदित्य ठाकरेंनी राज्यसभेची जागा सोडणार नसल्याची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. मित्रपक्षांनी वारंवार ज्येष्ठ नेत्यांची नावं पुढे करून आमच्या वाट्याच्या जागा घेतल्या तर पक्षाची वाढ कशी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

महाविकास आघाडीमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा आणि सल्लामसलती सुरू होत्या. मात्र, पर्याय संपत चालल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचंच नाव पुढे करण्याशिवाय मविआसमोर दुसरा पर्याय उरला नव्हता.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget