एक्स्प्लोर

ST Strike : एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार? 

ST Strike : एसटी संपाबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर हा संप सुरु राहतोय की काय अशी परिस्थिती आहे.

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यावरची पुढची सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे हा संप आता पुढचा महिनाभर सुरु राहतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

एसटी संपाबाबत आज न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू होत आहेत. मग यावेळी खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. एसटी कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय याचाही विचार करावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.

संपकाळात कामावर येऊ इच्छिणा-या कामगारांना संपकऱ्यांनी आडकाठी केली जात आहे असं राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं. मात्र अशी घटना घडल्याचं संपकरी कामगार संघटनेनं नाकारलं आहे. आता यावर पुढच्या महिन्यात, 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 

एसटी संपात (ST Strike) नक्षलवादी चळवळीचा (Naxal) शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात (High Court) याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला. गुणरत्न सदावर्ते न्यायमूर्तींना म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत.  त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या"  

दरम्यान आजच्या सुनावणीत सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. "प्रत्येक संपकरी संघटना स्वतंत्रपणे समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत", असं राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Maj

 

 



महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget