एक्स्प्लोर
भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार
सरकारमधील मंत्री, पक्षप्रवेशांबद्दल खरंतर मुख्यमंत्री निर्णय घेतात, मात्र सध्याच्या सरकारमधले निर्णय कोल्हापुरातून होत असल्याची मिश्किल टिपणी शरद पवारांनी केली.
![भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार Sharad Pawar Attacked On Amit Shah Latest Updates भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/20123544/kolh-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, असा इतिहास आहे. पण या घोषणा सध्या कोल्हापुरातूनच होतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
शरद पवार यांनी मार्मिक भाषेत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. शिवाय, नारायण राणे यांना भाजपप्रवेशासाठी ‘शुभेच्छा’ही दिल्या. ते कोल्हापुरात बोलत होते.
अमित शाहांची खिल्ली
“अमित शाह यांचे गुजरातमध्ये उद्योगधंदे आहेत, हे मला माहिती होतं. पण आता अमित शाह यांनी पंचांग घेऊन भाकीत सांगण्याचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.”, अशी खिल्ली शरद पवारांनी उडवली.
चंद्रकांतदादांना टोला
सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, असा इतिहास आहे. पण या घोषणा सध्या कोल्हापुरातूनच होतात.”, असा टोला चंद्रकांत पाटील यांना पवारांनी लगावला.
राणेंना शुभेच्छा
‘ना खाऊंगा, ना खाने दूँगा’ अशी परिस्थिती सध्या भाजप सरकारमध्ये राहिली नसल्याचं सांगत शरद पवारांनी नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशासाठी ‘शुभेच्छा’ दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांची त्यांच्या कोल्हापूर इथल्या रुईकर कॉलनी परिसरातल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवारांनी एन. डी. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)