'स्कल ब्रेकर चॅलेंज' करताना सांगलीतील विद्यार्थी गंभीर जखमी
एखादा मुलगा हवेत उडी मारतो आणि याचवेळी त्याच्यासोबतच उभे असलेले मित्र त्याला पायाने खाली पाडतात. यामुळे संबंधित मुलगा हा जोरात खाली पडतो आणि त्याच्या कमरेला तसेच डोक्याला गंभीर मार लागतो. सध्या या चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सांगली : सध्या अनेक पालकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चॅलेंजचा धसका घेतला आहे. कारणही तसंच आहे म्हणा, सोशल मीडियावर सध्या एक चॅलेंज व्हायरल होत आहे. ब्लू व्हेल, किकि चॅलेंजनंतर हे स्कल ब्रेकर चॅलेंज आता पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सांगलीत स्कल ब्रेकर चॅलेंजमध्ये शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. विद्यार्थ्याचा हात मोडला असून त्याच्या पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे. पृथ्वीराज प्रशांत देसाई असं या जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे.
एखादा मुलगा हवेत उडी मारतो आणि याचवेळी त्याच्यासोबतच उभे असलेले मित्र त्याला पायाने खाली पाडतात. यामुळे संबंधित मुलगा हा जोरात खाली पडतो आणि त्याच्या कमरेला तसेच डोक्याला गंभीर मार लागतो. सध्या या चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टिकटॉक'चे वेड आता शाळेच्या प्रांगणापर्यत पोहोचले आहे. सांगलीत टिकटॉक'मुळे शााळेच्या आवारात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. टिकटॉक'वरील स्कल ब्रेकर चॅलेंज या व्हिडीओचे शााळेत अनुकरण करत असताना ही घटना घडली असून यात विद्यार्थ्यांचा हात मोडला आहे. तर पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे.
पाहा व्हिडीओ : 'स्कल ब्रेकर चॅलेंज'मध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी, सांगलीमधील घटना
जखमी मुलगा सांगलीतील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकाराने पालकवर्गासह शिक्षक वर्गात भीती निर्माण झाले आहे. या घटनेतून टिकटॉकवरील जीवघेण्या खेळांचे अनुकरण शालेय स्तरावर सुरू असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पालकांना कळाल्यानंतर ते हादरुन गेले. त्यांनी याबाबत शाळेकडे तक्रार केली आहे.
तीन मुलांनी किंवा मुलींनी सामुदायिक उडी मारल्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्या मुलाच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा एक व्हीडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. स्कल ब्रेकर चॅलेंज असे या चॅलेंज प्रकारचे नाव असून टिकटॉकवर या चॅलेंजने सध्या धुमाकूळ घालत आहे. हाच व्हिडीओ पाहून शाळेतील दोन मुलांनी जखमी मुलास घेऊन अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. टिकटॉकवरील या चॅलेंजच्या व्हिडीओबाबत जखमी विद्यार्थ्यांस काही कल्पना नव्हती, असे जखमी मुलाच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यास तो तयार झाला आणि त्यात त्याला ही गंभीर इजा झाली. या प्रकाराने मुलाचा टिकटॉक पाहण्याचा वाढलेला ओढा आणि मुलं त्याचे अनुकरण करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुले असे व्हिडीओ पाहणार नाहीत याची पालकवर्गानें खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या :