एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सांगली मिरज कुपवाड निवडणूक निकाल 2018 Live

sangli election Result 2018 सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2018: सांगलीकरांचा कौल कुणाला याचा निकाल आज जाहीर होणार आहे.

सांगलीसांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2018 आज जाहीर होत आहे. राज्याचं लक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक निकालाकडे लागलं आहे.  सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 1ऑगस्टला सुमारे 60 टक्के मतदान झालं. विजयी उमेदवारांची यादी सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याचं चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसने इथे यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. मात्र तरीही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर मात करत, सत्तेचे दिशेने पावलं टाकली आहेत. सांगली महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. त्यामुळं सांगली महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

LIVE  UPDATE

सांगली निवडणूक निकाल :  भाजपा – 41, काँग्रेस + राष्ट्रवादी  - 35, इतर – 2 आघाडीवर सांगली - प्रभाग 20 मध्ये मतमोजणीवरुन गोंधळ, राष्ट्रवादीच्या योगेश थोरात यांना 4633 मतं, तर भाजपच्या विवेक कांबळी यांना 4626 मतं, अवघ्या 7 मतांच्या फरकामुळे फेरमतमोजणी सांगली निवडणूक निकाल :  भाजपा – 38, काँग्रेस + राष्ट्रवादी  - 24, इतर – 2 आघाडीवर भाजपा – 29, काँग्रेस + राष्ट्रवादी  - 27, इतर – 2 आघाडीवर प्रभाग 4 - भाजप विजयी : निरंजन आवटी,पांडुरंग कोरे,अस्मिता सलगर,मोहना ठाणेदार प्रभाग 7 - भाजप विजयी : देवमाने आनंदा,खोत संगीता, कुल्लोली गायत्री,माळी गणेश यांचा विजय प्रभाग सातमध्ये मिरजेतील काँग्रेसचे दिग्गज नेते किशोर जामदार पराभूत भाजपा – 23, काँग्रेस + राष्ट्रवादी  - 22, इतर – 2 आघाडीवर प्रभाग क्रमांक- 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी नर्गिस सय्यद, मेनुद्दीन बागवान, रजिया काजी अथहर नायकवडी विजयी अपक्ष आल्लू काजी यांनी आतहर नायकवडी यांना दिली कडवी लढत 96 मतांनी काजी पराभूत

-सांगली निवडणूक निकाल : प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीने खाते उघडले, 3 जण विजयी

-प्रभाग 15 - मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण काँग्रेस विजयी

-सांगली निवडणूक निकाल : भाजप 7, काँग्रेस 6, राष्ट्रवादीला 6 जागांवर आघाडी -सांगली निवडणूक निकाल :  प्रभाग 15 चा निकाल जाहीर, काँग्रेस 3 तर राष्ट्रवादी 1 जागी विजयी -सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा -सांगली निवडणूक निकाल : भाजप 7, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 4, अपक्ष 1 जागा -भाजप 6, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी -पहिला कल हाती, काँग्रेसला 3 तर भाजपला एका जागेवर आघाडी सांगलीत 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम – 8 बहुरंगी लढत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. अर्थात यामागे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, मदन पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला होता. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. वर्षांनुवर्षे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणारी भाजपा यात पुढे आहे. राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा देत दंड थोपटलेत. सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव महापालिकेचा आज निकाल  शिवसेना स्वबळावर शिवसेना 51 जगांसह यंदा प्रथमच सांगली मनपाची निवडणूक स्वबळावर लढतेय. “सांगलीच्या विकासाचे ध्येय ज्याच्याकडे आहे, सांगली चांगली करण्यासाठी जे धडपडत आहेत, त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात अली असून, शिवसेनेचा महापालिकेवर भगवा फडकेल” असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत शिवसेनेलादेखील पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागला आहे. कारण शिवसेनेत नाराज असलेल्या एका गटाने स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून 9 उमेदवार उभे केलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राज्याबरोबरच महापालिकेतील राजकारण सांभाळणारे काँग्रेसचे दिवगंत नेते पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या पश्चात ही महापालिकेची पहिलीच निवडणूक होतेय. त्यात भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. याचाच धसका घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडीचा मार्ग स्वीकारला आहे. “धर्मनिरपेक्ष विचारांची फूट होणार नाही आणि एकसंघपणे या शहराच्या विकासाची काळजी घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचा पुन्हा एकदा महापालिकेवर झेंडा फडकेल आणि यात राष्ट्रवादी पक्षाची मोलाची साथ लाभेल असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना वाटतोय. यानिमित्ताने जिल्हा परिषदेवेळी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची चूक यावेळी जयंत-विश्वजित जोडगोळीने सुधारली आहे. तसेच जयंत पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षपदी निवड झाल्याने जयंत पाटील यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पूर्ण ताकदीने भाजप मैदानात जिल्हा परिषदेचा ताबा मिळवल्यानंतर सांगली महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली आहे. भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले आहेत. मागील 20-22 वर्षांपासून काँग्रेस या महापालिकेत सत्तेत आहे. मात्र काँगेसने या शहराचा विकास दूरच या सांगलीचे खेडे बनवले असल्याचा आरोप केला आहे. याच बरोबर सांगलीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या, सांगली , मिरज, कुपवाड महापालिका काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करा अशी सादही भाजपच्या नेत्यांकडून घालण्यात आली आहे. तसेच या महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असा दावाही भाजपचे नेते करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांसाठी यंदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असताना पक्षांकडून तिकीट न मिळाल्याची संख्यादेखील मोठी आहे. आतापर्यंत अशा एकूण 35 नाराजांना अपक्ष विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असताना, आता या अपक्ष विकास आघाडीमुळे मतांमध्ये आणखी विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, जी राजकीय पक्षासाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरु शकते. सांगली महापालिका निवडणुकीतील ठळक मुद्दे - जिल्ह्यात वाढत चाललेली भाजपची ताकद रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीत आघाडी - भाजप - शिवसेनेचा मात्र सवतासुभा कायम , दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहेत. - जिल्हा परिषदेवर ताबा मिळवल्यानंतर महापालिकादेखील ताब्यात घेण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्याच्या होम ग्राऊंडवर पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठा पणाला - कै. पतंगराव कदम, कै. मदन पाटील यांच्या पश्चात्य वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची ही पहिलीच निवडणूक - एकूण 78 पैकी 40 जागांवर काँग्रेस तर 29 जागांवर राष्ट्रवादी लढणार - 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि 4 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार देणार - भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले - शिवसेनेने 78 पैकी 52 ठिकाणी उमेदवार उभे केलेत - सांगली जिल्हा सुधार समिती  15 जागांवर निवडणूक लढवणार प्रमुख पक्ष आणि उमेदवार- एकूण जागा 78 काँग्रेस - 45 राष्ट्रवादी - 32 भाजप – 77 शिवसेना -45 स्वाभिमानी विकास आघाडी - 9 सुधार समिती - 15 संबंधित बातम्या   सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव महापालिकेचा आज निकाल  सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018: सांगलीकरांचा कौल कुणाला?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
Embed widget