एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साताऱ्यात शरद पवारांनी गरीब, गरजूंसाठी दिलेली रेमडेसिवीर गायब, राष्ट्रवादीचा आरोप
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 175 रेमडेसिवीर इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयाला दिली होती. या इंजेक्शनमधील काही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाल्याचा आरोप सातारा राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांचे कोरोनाच्या आजारातून जीव वाचावे यासाठी 175 रेमडेसिवीर इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयाला दिली होती. या इंजेक्शनमधील काही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाल्याचा आरोप सातारा राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून काही दिवसांपूर्वी 125 रेमडेसिवीर इंजेक्शन सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून दिली होती. तर 50 रेमडेसिवीर इंजेक्शन कराड येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्याकडे सुपूर्त केली होती. या एकूण 175 रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी काही इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयातून गायब झाली असल्याचे सांगत सातारा राष्ट्रवादी पक्षाकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
रेमेडिसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबईत सात जणांना अटक
यातील 18 इंजेक्शन चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी यांना या बाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.
नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले आहे. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर मेडिकल स्टोअर मध्ये मिळत नाहीत पण बाजार भावाने एका इंजेक्शनची किंमत 5 हजार रुपये आहे. मात्र 25 हजार रुपयांना ब्लॅकने हे औषध विकले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन याची चौकशी करावी अस तक्रारीत म्हटलं आहे.
Remdesivir Medicine | रेमडेसिवीरचा काळाबाजार, चार इंजेक्शनसाठी मागितले 80 हजार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement