एक्स्प्लोर
रेमेडिसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबईत सात जणांना अटक
रेमडेसिवीर इंजेक्शनची मूळ किंमत 5,400 रुपये आहे. मात्र अत्यवस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णांना इंजेक्शन आवश्यक असल्याने याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर या कोरोनाच्या आडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करून पैसे कमविणारे ही समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने रेमेडिसिवीरसारख्या कोरोनाग्रस्तांना फायद्याचे असलेल्या औषधांचा कालाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेमेडिसिवीर किंवा टोसीलिझोमाब सारख्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आराम देणाऱ्या औषधांची किंमत सहा ते दहा पट वाढवून या औषधांचा काळा बाजार करणारी ही टोळी आहे. एफडीएला याबाबत माहिती मिळताच त्यांनी नकली गिऱ्हाईक बनून त्यांना संपर्क केला.
मुलुंडमधून त्यांनी ही औषध देताना दोन जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष सातच्या मदतीने या टोळीतील आणखी 5 अशा सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून रेमेडिसिवीरच्या 13 बॉटल ही जमा करण्यात आल्या आहेत. सध्या याचा तपास गुन्हेशाखा करीत आहे. तर एफडीए देखील अशा प्रकारे कोरोनाच्या काळात औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर आता कडक कारवाई करीत आहेत.
याआधीही मुंबईत मीरा रोड पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली होती. मीरा रोडमधील एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाने या इंजेक्शनसाठी धावपळ सुरु केली होती. त्यावेळी एका व्यक्तीने या एका इंजेक्शनसाठी तीस हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु चार इंजेक्शन हवी असल्याने तडजोडीनंतर एका इंजेक्शनचे 20 हजार याप्रमाणे चार इंजेक्शनचे 80 हजार ठरले होते. त्या नातेवाईकाने मीरा रोड पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी साईबाबानगर भागात शुक्रवारी सायंकाळी सापळा रचला आणि हे औषध विकायला आलेल्या दोघांना अटक केली.
रेमडेसिवीर इंजेक्शनची मुळ किंमत 5,400 रुपये आहे. मात्र अत्यवस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णांना ही इंजेक्शन आवश्यक असल्याने याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
संबंधित बातम्या
BLOG | अगतिकता रेमेडिसिवीर औषधाची
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement