एक्स्प्लोर
Advertisement
नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!
पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/816119044600459264
'राजसंन्यास' या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान चार कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याआधारेच आता पोलिस तपास करत आहेत. पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.
महत्त्वाचं म्हणजे या घटनेची कोणतीही माहिती उद्यानातील सुरक्षारक्षकांनाही नव्हती. पण जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुतळा हटवतानाची दृश्ये कैद झाली असण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण 1962 साली बसवलेला पुतळा इतक्या वर्षांनी का हटवला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राम गणेश गडकरी यांचा परिचय
- टोपणनाव : गोविंदाग्राज, याच नावाने 150 कवितांचं लिखाण
- एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन अशी चार नाटकं लिहिलं
- अनेक नाटकांची नावं पाच अक्षरीच. एकच प्याला आजही लोकप्रिय
पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणं ही निंदनीय बाब आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.
गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु : महापौर
पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शक्तींमार्फत हा प्रयत्न होत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसंच राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु, असं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement