एक्स्प्लोर
पवारांशी राजकीय चर्चा नाही, केवळ सदिच्छा भेट : राज ठाकरे
राज ठाकरे – शरद पवार यांच्या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीचं नेमकं निमित्त काय, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते मुंबईतील पेडर रोड येथील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले.
भेटीत चर्चा काय झाली?
“शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखतीनंतर भेट झाली नव्हती, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती.”, अशी माहिती स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली.
राज ठाकरे – शरद पवार यांच्या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे या भेटीचं नेमकं निमित्त काय, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यास सुरुवात झाली होती. अखेर स्वत: राज ठाकरे यांनी एबीपी माझाला भेटीबाबत माहिती दिली.
उद्या गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत, पक्षाची पुढील वाटचालही मांडणार आहेत. शिवाय, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार यांची ‘महामुलाख’ झाली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळतील का, अशी चर्चा सुरु होती.
या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement