एक्स्प्लोर

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचं किती नुकसान? प्रशासनाकडून माहिती जाहीर

रायगड जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला असून, या भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरु आहे.

अलिबाग : तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची सुरुवात झाली. त्यापूर्वी काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचे झोत सुरुच होते. चक्रीवादळामुळं उदभवलेल्या या परिस्थितीमुळं सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तालुकानिहाय पद्धतीनं देण्यात आलेल्या या माहितीमध्ये किती नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, हेसुद्धा सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, रायगडमध्ये आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

Cyclone Tauktae : पाहा कशी वाढेल तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता? 

तालुकानिहाय सविस्तर माहिती :-

अलिबाग-  अलिबागमध्ये 22 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. इथे पावसाचे सरासरी प्रमाण 24 मि.मी. असून, 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पेण - पेण मध्ये आतापर्यंत एका घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 8 मि.मी. असल्याचं दिसून आलं. इथे 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुरुड- मुरुड तालुक्यातील 5 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 32 मि.मी. इतके आहे. 316 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पनवेल - पनवेल तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 11. 50 मि.मी. इतके असून, 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
      
उरण- उरण तालुक्यातील एका घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 व्यक्ती आणि एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 27 मि.मी. आहे. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
       
कर्जत - कर्जत तालुक्यातील 17 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 7.80 मि.मी. इतके असून,  48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
  
खालापूर -  खालापूर तालुक्यातील 91 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 12 मि.मी. इतके असून, 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
   
माणगाव- माणगाव तालुक्यातील 27 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 17 मि.मी. इतके असून, 291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
    
रोहा- रोहा तालुक्यातील 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 19 मि.मी. इतके असून, 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. 
  
सुधागड - सुधागड तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 26 मि.मी. इतके असून असून, 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
    
तळा- तळा तालुक्यातील 23 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 घराचे पूर्णता नुकसान झाले आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 21 मि.मी. असून 36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
   
महाड - महाड तालुक्यातील 38 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 23 मि.मी. इतकी असून, 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
 
पोलादपूर - पोलादपूर तालुक्यातील 96 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 41 मि.मी. इतके असून, 81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
  
म्हसळा-  म्हसळा तालुक्यातील 204 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 44 मि.मी. इतके असून, 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
    
श्रीवर्धन - श्रीवर्धन तालुक्यातील 335 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 48 मि.मी. इतके असून, 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget