Cyclone Tauktae : पाहा कशी वाढेल तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता?
खवळलेला समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं किनारी भागात मोठं नुकसान झालं
Cyclone Tauktae : गुरुवारपासूनच सुरु झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं शुक्रवारी चक्रीवादळाचं रुप घेतलं आणि लक्षद्वीप, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळाला. खवळलेला समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं किनारी भागात मोठं नुकसान झालं, तर बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानं झोडपलं.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून 150 किमी अंतरावर खोल समुद्रात केंद्र असणाऱ्या तोक्ते या वादळाने आता उत्तरेकडे वळण्यास कूच केली आहे. मुंबईला हे वादळ धडकलं नाही. पण, याचे परिणाम मात्र शहरावर दिसून आले. वादळी वाऱ्यामुळं अनेक भागांत झाडं कोसळण्याच्याही घटना घडल्या.
Cyclone Tauktae : जाणून घ्या कसा सुरु आहे तोक्ते चक्रीवादळाचा प्रवास; वादळ नेमकं कुठे पोहोचलं?
हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी नुकतंच एक ट्विट करत या वादळाच्या तीव्रतेबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांच्या भेटीला आणली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या वादळ मुंबई किनारपट्टीलगतच्या समुद्रात असून, तिथे त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. ज्याचे थेट परिणाम हे शहरातील वातावरणावर दिसून येत आहेत.
#TauktaeCyclone latest track and intensity forecast issued at 11 am by IMD pic.twitter.com/aMrDEXH42K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 17, 2021
Extremely Severe Cyclonic Storm Tauktae
— India Meteorological Department (@Indiametdept) May 17, 2021
INSAT 3D satellite-based centre position
at 1130 IST - 19.2N & 71.5E
Distance from Diu is 182km (South-southeast)
Distance from Mumbai is 142km (west-northwest) pic.twitter.com/rr6w8PxOOO
तोक्ते चक्रीवादळानं जोर धरल्यामुळं कोकणातही पाऊस सुरुच असून, पालघर, रायगड, ठाणे आणि मुंबईमध्ये काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत आहे. समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मासेमारांच्या नौका किनाऱ्यावर घेण्यात आल्या आहेत. तर सावधगिरी म्हणून एनडीआरएफची अनेक पथकं किनारपट्टी भागात तैनात ठेवण्यात आली आहे. तोक्ते चक्रीवादळ पुढील 12 तासांपर्यंत तीव्र स्वरुपात दिसेल असा अंदाज वर्तवण्याल आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासाच्या दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबत वाऱ्याची गती 90-100 किमी राहण्याची संभावना आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :