एक्स्प्लोर

Cyclone Tauktae : पाहा कसा सुरु आहे तोक्ते चक्रीवादळाचा प्रवास; वादळ नेमकं कुठे पोहोचलं?

कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे.

Cyclone Tauktae : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तोक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे. रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मुंबईला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे. पुढील चार - पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे. 

Cyclone Tauktae : मुंबईत 'तोक्ते' चक्रीवादळ धडकणार नसलं, तरीही त्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात 

तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामार्थ वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा उसळणं अपेक्षित आहेत. तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि घाट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस (तुरळक मोठ्या सरी) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, खांब वाकणे, विजेच्या तारा पडणे, होर्डिंग्ज पडणे, पत्रे उडणे, कच्च्या भिंती पडणे आदी घटना घडू शकतात, याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि पालिका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुढचे 12 तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार असून, तासागणिक ते अधिक रौद्र रुप धारण करणार आहे. शिवाय वाऱ्याचा वेगही वाढताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Embed widget