Pune News: पुण्यात दोन ठिकाणी कोसळले जुने वाडे; दोन जण जखमी
पुण्यातील नाना पेठेतील मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे.

Pune News: पुण्यातील (Pune) नाना पेठेतील मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. त्याचबरोबर सोमवार पेठेतील बोळे वाडा येथे पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला आहे.
दोन्ही अपघातात कोणतीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही आहे.
साधारण साडे-सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कंट्रोलरुम मध्ये जीना कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. पुण्यतीसल जुने वाडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे वाडे धोकादायक झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हे वाडे सोडा, अशा प्रकारच्या नोटीसा पुणे महानगरपालिकेने नागरिकांना बजावल्या होत्या त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील 38 हून अधिक अतिधोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. एक-दोन नाहीतर तब्बल 478 वाडे धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
पालिकेच्या नोटिसांचं पालन न केल्याने या प्रकाराच्या अपघातांना पुणेकरांना सामोरं जावं लागत आहे. पुणे शहरात दरवर्षी भींत कोसळल्याच्या आणि जुने वाडे कोसळल्याच्या घडना सातत्याने घडतात. पुणे शहरात अनेक जुने वाडे आहेत. ते वाडे कालांतराने जीर्ण झाले आहेत. जुन्या वाड्यांना शाबूत ठेवण्यासाठी डागडूजी केली जाते. त्यामुळे वाड्यांना फार वेळा धक्का बसतो. त्यामुळे वाडे पुन्हा खिळखिळे होतात. असे वाडे नागरिकांसाठी धोकादायक आहे. या वाड्यांबाबत महापालिकेअंतर्गत अनेकदा पाहणी केली जाते. त्यासाठी वेळोवेळी नागरिकांना सुचना दिल्या जातात. मात्र नागरिकांना हे वडलोपार्जित वाडे सोडायचे नसतात. वासरा हक्काने मिळालेला आहे. त्याची देखभाल करु, त्याची डागडूजी करु, असं नागरिकांकडून सांगण्यात येतं. शिवाय अनेक नागरिका आर्थिक परिस्थितीमुळे हे वाडे सोडण्याच्या तयारीत नसतात. त्यामुळे आलं त्या संकटाला तोंड देऊ, अशी तयारी अनेकदा नागरिकांची दिसते. मात्र कोसळल्यावर पालिकेचा आदेश पाळला असता तर बरं झालं असतं, असंही मत नागरिक व्यक्त करतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
