एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिंपरी चिंचवडमध्ये सहा दुचाकी जळून खाक
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र काही घरांचं नुकसान झालं आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये जळीतकांडाची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. मिलिंदनगरमधील कपिला वास्तू सोसायटीमध्ये मध्यरात्री ही घटना घडली.
अग्निशमन दलाला पहाटे सव्वा चारच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. परंतु त्याआधी आग विझवण्याच्या ज्येष्ठ महिलेसह पाच ते सहा जण जखमी झाले. आगीची झळ चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली, यावरुन आगीची तीव्रता समजू शकते.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगीत दुचाकींसह काही घरांचंही नुकसान झालं आहे. तरीही कोणी कटकारस्थान तर रचलं नाही ना? यादृष्टीनेही पिंपरी पोलीस तपास करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
भारत
Advertisement