एक्स्प्लोर

Mumbai Local: मुंबई महापालिका निवडणुकीआधी रेल्वेकडून मोठी घोषणा, वंदे मेट्रो श्रेणीतल्या 238 एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत येणार

Mumbai AC Local Train: मुंबईतील बहुंताश लोकल आता वातानुकूलित होणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईतील लोकल 100 टक्के वातानुकूलित करण्याचा रेल्वेचा मानस आहे.

Mumbai AC Local Train: मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच 238 नव्या एसी लोकल (Upgraded AC Local) दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे.  रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती (Upgraded Version) म्हणून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. 

मुंबईत लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) श्रेणीतल्या असतील. या नवीन अपग्रेडेड लोकलसाठी (Upgraded AC Local) रेल्वेला जवळपास 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, कालांतराने मुंबईतील सर्वच लोकल वातानुकूलित (AC Local) करण्याचे रेल्वेचे टार्गेट आहे. ‘मेक इन इंडिया’ मार्गदर्शक तत्त्वांवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना गारेगार अन् आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर 238 वंदेभारत लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी (MUTP) प्रकल्पांतर्गत 238 वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली. याबाबतचे पत्र देखील रेल्वे मंडळाने शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पाठवलं आहे.

या वंदे भारत लोकलचे तिकीट दर (Ticket Rate) एसी लोकलप्रमाणेच जास्त असल्याने सर्वसामान्यांचा लोकल प्रवास मात्र महागण्याची शक्यता आहे. या लोकल वातानुकूलित असल्याने लोकलची दारं बंद राहतील, ज्यामुळे लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित देखील होणार आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केल्याचं आता  बोललं जातंय.

नवीन वातानुकूलित लोकलच्या (AC Local) देखभालीसाठी मुंबईत दोन नव्या कारशेड (New Carshed) उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकलच्या देखभालीसाठी डेपोच्या उभारणीला यापूर्वीच मंजूरी देखील मिळाली आहे. हे डेपो वंदे भारत (Vande Bharat) तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीनेच बांधण्यात येणार आहेत. नवीन आधुनिक एसी लोकल या वंदे भारत मेट्रोच्या (Vande Bharat) धर्तीवर बनवण्यात येणार आहेत. 

हेही वाचा:

Ajit Pawar on Devendra Fadnavis: दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे, गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे; अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना खडेबोल

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget