एक्स्प्लोर

Mumbai AC Local Issue : बदलापुरातून एसी लोकल पुन्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासनानं आता उचललं हे पाऊल

बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी (Badlapur News) विरोध केल्यानंतर बंद करण्यात आलेली एसी लोकल (AC Local update) पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai AC Local Issue : बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी (Badlapur News) विरोध केल्यानंतर बंद करण्यात आलेली एसी लोकल (AC Local update) पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेनं तशी लेखी सूचना बदलापूर स्थानकात लावली असून एसी लोकलबाबत प्रवाशांच्या सूचना मागवल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एसी लोकल सुरू केल्या होत्या. मात्र साध्या लोकल रद्द करून त्या जागी या लोकल चालवण्यात येत असल्यानं बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सलग तीन दिवस आंदोलन करत स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं नमतं घेत 24 ऑगस्ट रोजी एसी लोकल रद्द करून पुन्हा साधी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 

रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात सूचना लावली

या गोष्टीला 18 दिवस उलटल्यानंतर रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एक सूचना लावली आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाला पुन्हा एसी लोकल सुरू करण्याची इच्छा असून याबाबत प्रवाशांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पसरला आहे. 

मधल्या वेळेत एसी लोकल सुरू करण्याची मागणी 

मुळातच एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध नसून आमची साधी लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच बदलापूर रेल्वे स्थानकात अनेकदा दोन लोकलमध्ये एक तास किंवा अर्ध्या तासाचं अंतर असतं. या मधल्या वेळेत एसी लोकल सुरू करण्याची मागणी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी केली आहे. 

याबाबत रेल्वेला आमच्या सूचना सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता एसी लोकल पुन्हा सुरू होते का? आणि पुन्हा संघर्षाची वेळ येते का? याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.

मध्य रेल्वेने नेहमीच्या लोकल रद्द करून एसी लोकल सुरू केल्याने कळवा-मुंब्रातील रेल्वे प्रवाशांनी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात एसी लोकलविरोधात आंदोलन देखील केले होते. एकूणच एसी लोकलविरोधात बहुतांश सामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Badlapur Railway Station : बदलापूर स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त, AC लोकलविरोधात आक्रमक पवित्रा

Protest Against AC Local: खबरदार...नेहमीची लोकल रद्द कराल तर! एसी लोकलविरोधात कळवावासिय आंदोलनाच्या पावित्र्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget