एक्स्प्लोर

Mumbai Local : मध्य रेल्वेवरच्या नव्याने सुरु केलेल्या दहा एसी लोकल रद्द, प्रवाशांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी रोज दहा एसी लोकल ट्रेन्स चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाविरोधात बदलापुरातल्या संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं. अखेर या आंदोलनला यश आले असून नव्याने सुरू केलेल्या एसी लोकल तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर (Central Railway) नव्याने सुरू केलेल्या दहा एसी लोकलच्या (Mumbai AC Local) फेऱ्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एसी लोकलमुळे सर्वसामान्यांचा खोंळबा होत असून एसी लोकलचे दरही (AC Local Ticket Fare)  सामन्यांना न परवडणारे आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी मध्य रेल्वे मार्गावर आणखी दहा वातानुकुलित लोकल चालवणार असल्याचे जाहीर केले. या वातानुकूलित लोकल साध्या लोकांच्या जागी चालवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने  प्रवासी संघटना नाराज झाल्या. साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी रोज दहा एसी लोकल ट्रेन्स चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाविरोधात बदलापुरातल्या संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं. अखेर या आंदोलनला यश आले असून या सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

  मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयात काल दुपारी आमदार जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक झाली. साध्या लोकलमधून सुमारे चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं एक साधी लोकल रद्द केल्यानंतर या हजारो प्रवाशांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न आव्हाड यांनी या बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर आता नव्याने सुरू केलेल्या एसी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्याआक्रमक भूमिकेनंतर अखेर रेल्वे प्रशासनानं नमतं घेत एसी लोकल उद्यापासून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. 

ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका एक वरदान असेल असे भसवण्यात आले होते. मात्र जेव्हा पासून या दोन मार्गिककाचे लोकार्पण झाले आहे, तेव्हापासून फक्त एसी लोकलच चालवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मर्गिकांचा प्रवाशांना तसा काहीच उपयोग झाला नाही.   एसी लोकलला सर्वच मार्गांवर प्रवाशांचा थंड प्रतिसाद आहे. मुंबईतील सर्वसामान्य  प्रवाशांचा विचार  केला तर या प्रवाशांसाठी एसी लोकलचे तिकीट किंवा पास काढणे म्हणजे महिन्याभराचे दोन वेळेचे जेवायचे पैसे खर्च करण्यासारखेच आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Ajit Pawar Bag Checking : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी,बॅगेत सापडल्या चकल्याJustice KU Chandiwal : निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचे ABP Majhaवर गौप्यस्फोटABP Majha Headlines :  12 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Embed widget