एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Nawab malik: नवाब मलिकांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

मुंबई: तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून  ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी  मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PMTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget