Nawab Malik: नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या दिवसभरात आज काय काय घडलं?
ED questioned Nawab Malik : आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी नवाब मलिक धडकले. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
Nawab Malik ED : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले. जाणून घेऊयात दिवसभरातील घटनाक्रम:
> राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी पहाटे 5 वाजताच ईडीची टीम पोहचली. दोन तास घरी चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं.
> नवाब मलिक यांच्यावर अचानक पडलेल्या धाडीमुळे कार्यकर्त्यानी प्रचंड नाराजी व्यक्त करत ईडीच्या कार्यालयाकडे मोर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
> मलिक यांना चौकशीसाठी नेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया. भाजपवर निशाणा साधला
> अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी करण्यात येत असून याबाबत बोलताना 20 वर्षांनी चौकशी का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले.
> नोटीस न पाठवता मंत्र्यांना ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीका राष्ट्रावदीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
> नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तपास यंत्रणांचा राजकारणासाठी वापर; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
> नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा अजून एक प्रकार आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
> साधारणपणे 12 वाजता सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर एकत्र आले आणि त्यांनी थेट ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना अटकाव केला.
> ना डरेंगे ना झुकेंगे, नवाब मलिक यांच्या कार्यालयातून Tweet मार्फत भाजपवर हल्लाबोल
> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. माजिद मेनन यांची पत्रकार परिषद. ईडीकडून जी चौकशी नवाब मलीक यांची करण्यात आली यामध्ये 1993 सालातील बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी प्रकरण असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनी दिली आहे. शिवाय याप्रकरणात खरेदीदार नवाब मलिक यांचा मुलगा असल्याचं स्पष्ट केलं.
> दरम्यान, भाजपकडूनही महाविकास आघाडीवर आणि नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र