एक्स्प्लोर
मुंबईत चोरीच्या आरोपात तीन माकडं ताब्यात

मुंबई : मुंबई लोकल आणि स्टेशनवर गोंधळ घालून पैसे चोरल्याप्रकरणी 3 माकडांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून लोकांना त्रास देणाऱ्या 3 महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या महिला रेल्वेत आणि स्टेशनवरही लोकांना भीती दाखवून त्यांची लूट करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबईतील लोकलमध्ये अपंगांच्या डब्यात जाऊन पैशांची मागणी या महिला करत होत्या. पैसे देण्यास नकार दिल्यावर माकडांना अंगावर सोडण्याची धमकीही देत होत्या. या माकडांना लोकांना घाबरवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या माकडांना घाटकोपरच्या रेल्वे पोलिसांच्या चौकीत ठेवण्यात आले आहे. हे 3 महिलांचं टोळकं भीक मागण्यासाठी डब्यात चढत होतं आणि माकडांचा वापर करून लोकांकडून पैसे लूटत होतं. गेल्या 7 वर्षांपासून हे टोळकं सक्रीय असून याचा म्होरक्या वेगळाच असल्याचा संशय पोलिसांना आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























