Measles Outbreak : गोवरची नेमकी कारणे कोणती? काय काळजी घ्यावी? गोवरशी संबंधित दहा प्रश्नांची उत्तरं
गोवर हा आजार नेमका काय आहे? तसेच या आजाराची लक्षणे कोणती? आणि हा आजार होऊ नये यासाठी पालकांनी आणि बालकांची नेमकी कोणती काळजी घ्यावी या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत

मुंबई : मुंबईतील (Mumbai) गोवर (Measles) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मात्र, गोवर हा आजार नेमका काय आहे? तसेच या आजाराची लक्षणे कोणती? आणि हा आजार होऊ नये यासाठी पालकांनी आणि बालकांची नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
गोवर हा व्हायरल आजर आहे. तो व्हायरसमुळे होतो. लसीकरणामुळे गोवर टाळता येतो.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होते. विशेषत: लहान मुलांना घरातून बाहेर घेऊन जाताना पालक काळजी घेत होते. या काळात कोरोनावर भर असल्याने इतर आजारांचे लसीकरण मागे पडले आहे. वातावरण बदलामुळे गोवरची साथ दरवर्षी येतच असते या वर्षी रुग्णांची संख्या जास्त आहे. लसीकरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि बदलेले वातावरण हे गोवरचा संसर्ग वाढण्याचे कारण आहे.
गोवरचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आहे. यामध्ये मुले चिडचिड करतात, जेवण करत नाही. त्यानंतर ताप येतो. गोवरची पुरळ ही कानाच्या मागे येते. सर्वात अगोदर गोवरची पुरळ ही कानाच्या मागे दिसते. डोळ्यातून पाणी येणे, नाक वाहणे, जुलाब, खोकले ही देखील गोवरची लक्षणे आहेत.
गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. गोवरच्या दोन लसी घेतल्यानंतर त्याचा लगेच प्रभाव दिसून येतो. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करा. लस घेतल्यानंतर चार आठवड्यानंतर त्याचा प्रभाव जाणवेल. जी कुपोषित मुले आहे किंवा ज्यांना दुसरा आजार त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे
ताप आणि अंगावर पुरळ आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे.
ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा मुलांचे मृत्यू होतो. कुपोषण तसेच उपचाराला उशीर झाल्याने मुलांना न्युमोनिया, मेंदूमध्ये इन्फेक्शन यामुळे मृत्यू होतो. लस नसल्यामुळे मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे देखील मृत्यू होतो.
आईच्या शरीरात गोवरच्या अॅन्टबॉडी असतात. जेव्हा मुलाचा जन्म होतो त्यावेळी त्या अॅन्टबॉडी मुलाच्या शरीरात देखील जातात. त्यामुळे देखील काही केसमध्ये मुलांना गोवरचा संसर्ग पाहायला मिळतो.
कांजण्या आणि गोवरमध्ये पुरळाचे स्वरूप हा मुख्य फरक आहे. कांजण्यामध्ये येणारे पुरळ हे पाणीदार असतात तर गोवरमध्ये येणाऱ्या पुरळांमध्ये पाणी नसते
लिंबाच्या पाल्यात झोपवण्यास काही हरकत नाही. कडुलिंबामध्ये अॅन्टी इन्फेक्टरी गुणधर्म असल्याने त्याचा त्रास होणार नाही. परंतु गोवरचा इलाज हा घरच्या घरी करता येत नाही
गोवरसाठी घरीच उपचार करू नये. याचे कारण म्हणजे गोवरप्रमाणे दिसणारे इतर आजार देखील आहे. त्यामुळे नेमका गोवर आहे की इतर दुसऱ्या प्रकारचा आजार हे डॉक्टरांना कळणार आहे. त्यामुळे अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
