MARD Doctor Strike : आजपासून राज्यातील 'मार्ड'चे डॉक्टर बेमुदत संपावर, डॉक्टरांसोबतची चर्चा निष्फळ, काय आहेत मागण्या?
Mard Doctor Strike : आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. संप होऊ नये म्हणून प्रशासन आणि डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे प्रयत्नही निष्फळ ठरले.
Mard Doctor Strike : आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांचा संप होऊ नये म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे. कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. संपादरम्यान कोरोनाबाधितांच्या उपचारात खंड पडणार नाही, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यव्यापी मार्ड डॉक्टरांच्या संपाबद्दलची बैठक निष्फळ
सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. डॉक्टरांना लेखी आश्वासन न दिल्यानं बैठक कोणत्याही निर्णयाविना ही बैठक झाली. राज्य सरकारनं विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला. कोरोना काळातील फी माफ करण्याची निवासी डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.
काय आहेत मागण्या
राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला आहे. कोरोना काळातील फी माफ करण्याची प्रमुख मागणी आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. या संपामुळं ओपीडीसह इतर रूग्णसेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 18 मेडिकल कॉलेजमधील सुमारे सव्वा पाच हजार निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. रूग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील आणि कोरोना वॉर्डमधील निवासी डॉक्टर मात्र संपात सहभागी न होता सेवेत कायम राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या :