Maharashtra News Updates : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी अटक; सीबीआयने केली कारवाई
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Pune Bypoll : पुणे पोटनिवडणूक: कसबा पोटनिवडणुकीसाठी 50.6 टक्के मतदान झाले आहे.
Pune Bypoll : पुणे पोटनिवडणूक: कसबा पोटनिवडणुकीसाठी 50.6 टक्के मतदान झाले आहे.
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी अटक; सीबीआयने केली कारवाई
वन्यजीव प्राण्यांच्या अवयवाची तस्करी प्रकरणी गोंदियातून पाच जण ताब्यात
वन्यजीव प्राण्यांच्या अवशेसाच्या तस्करी प्रकरणी पाच जणांना वन विभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत येत असलेल्या पालांदूर येथे वन्य प्राण्यांच्या वशेषाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीनंतर कारवाई करून वन विभाग व पोलिस विभागाच्या वतीने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून जीवंत मोर, वन्य प्राण्यांचे अवशेष आणि 20 ते 21 लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे.
Maharashtra News : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती
Nanded News : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या स्वाक्षरीनिशी माणिक कदम यांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. माणिक कदम हे गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांशी संबंधित कार्यात आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. 2014 पासून माणिक कदम यांनी 'मी शेतकरी , आत्महत्या करणार नाही ' हा उपक्रम राबविला. तसेच शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी कार्य केले आहे.
Maharashtra Politics : विरोधकांचा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानावर बहिष्कार ; अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती
Maharashtra Politics : विरोधकांचा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानावर बहिष्कार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
