एक्स्प्लोर

पानमळ्याचा शेतकरी आजही लॉकडाऊन मध्येच!

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पानपट्ट्या आणि साहळे रद्द असल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय.

सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. काही अंशी शिथिलता दिल्यानंतर सध्या सर्वच शेतकरी सुखावला असला तरी आजही खाण्याच्या पानांचे पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच आहे.

पिढीजात पानमळ्याची शेती करणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या रुपाली आणि गणेश दळवी या शेतकरी दाम्पत्यावर आता कोरोनानं मोठा घाला घातला आणि संपुर्ण कुटुंबावर जनू संकटाची कु-हाडच कोसळली. लॉकडाऊनमुळे शेतातलं एक पानही बाजारात विकता आले नाही. त्यामुळं या कुटंबाचं तब्बल पाच लाखाचं नुकसान झाल. पै-पै साठवून पानमळ्याची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला आता आपले आश्रू लपवता येत नाहीत.

पशुसंवर्धनाला फटका लॉकडाऊनचा की काँग्रेसकडील खात्याचा?

कधी काळी सातारा जिल्ह्यातील आर्वी हे गाव फक्त आणि फक्त खाऊच्या पानाचं उत्पन्न घेणार गाव म्हणून ओळखल जायचं. संपुर्ण जग थांबल आणि या आर्वीकरांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत बाजारात खाऊची पानं विकली जात नाहीत. लॉकडाऊन शिथील केला असला तरी आजही पानपट्यांना प्रशासनाची बंदी आहे. अनेक सोहळ्यांना जाणारा माल बंद झाला, विमान सेवा बंद असल्यामुळे देशाबाहेर जाणारी पानही जाऊ शकत नाहीत. त्यामुळ या भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

जनावरांना वेली उपटून घालण्याची वेळ शेतातला माल विकला जात नाही म्हणून या भागातील शेतकरी दादासाहेब चव्हाण यांनी तर आपल्या शेतातल्या पानांच्या वेली उपटून त्या गाई म्हशींना चारा म्हणून टाकायला सुरुवात केलीय. कोरोनानं या पानमळ्याच्या शेतकऱ्याचा एका बाजूला घात केला तर दुसरीकडे काही दिवसापुर्वी झालेल्या चक्रीवादळानही मोठ नुकसान केलंय. दोनच खोडा झालेल्या या पानमळ्यातील शेताला चक्री वादळान झोपवलं. सुमारे 15 ते 20 फुटापर्यंत वाढलेला पानाचा वेल आज जमिनीदोस्त झाला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेचं पाणी वाढल्याने सतर्क राहण्याचं आवाहन

सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथील करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला खरा मात्र हा पानमळ्याचा शेतकरी असा एक वर्ग आहे की त्यांना शिथीलता मिळूनही ते आजही लॉकडाऊनमध्येच अडकलेत. सातारा जिल्ह्यात सुमारे 300 एकर पेक्षा जास्त शेतक-यांच नुकसान झालय. एकरी 20 लाख रुपये विचार केला तर नुसत्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं किती आणि राज्यातील पानमळेधारक शेतकऱ्यांचा विचार केला तर हा आकडा म्हणजे न विचार केलेलाच बरा. त्यामुळे शेतकऱ्यांची आस्था असणाऱ्या मुख्यमंत्रांनी आता पानमळेधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकड लक्ष दिले पाहिजे.

Sarus Crane | प्रेमाचं प्रतिक असलेल्या 'सारस' पक्षांच्या गणनेला सुरुवात

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राक्षसी कृत्याच्या 7 घटना, 10 जणांनी जीव गमावला; पहलगाम हल्ल्यातील काळीज पिळवटणाऱ्या सत्यकथा
राक्षसी कृत्याच्या 7 घटना, 10 जणांनी जीव गमावला; पहलगाम हल्ल्यातील काळीज पिळवटणाऱ्या सत्यकथा
pahalgam terror attack दैव बलवत्तर... अकोल्यातील विशाल अन् पत्नीचा जीव वाचला, पहलगामचा दौरा एक दिवस आधीच उरकला
दैव बलवत्तर... अकोल्यातील विशाल अन् पत्नीचा जीव वाचला, पहलगामचा दौरा एक दिवस आधीच उरकला
उन्हाचा कहर... देशातील सर्वाधित तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर
उन्हाचा कहर... देशातील सर्वाधित तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर
SRH vs MI : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेडसह इशान किशन अन् नितीशकुमार रेड्डी फेल, हैदराबादच्या नवाबांची लाजिरवाणी कामगिरी
हैदराबादचे नवाब फेल, काव्या मारनचा चेहरा पडला, होम ग्राऊंडवर अभिषेक शर्मा ते नितीशकुमार रेड्डी अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Left to Shrinagar: Pahalgam हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे श्रीनगरला रवानाABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPahalgam Terror Attack : निष्पाप लोकांना मारून काय मिळालं? काश्मीर नागरिकांचा संतप्त सवालPahalgam Terror Attack : दिलीप देसलेंचं पार्थिव पनवेलमध्ये आणलं ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राक्षसी कृत्याच्या 7 घटना, 10 जणांनी जीव गमावला; पहलगाम हल्ल्यातील काळीज पिळवटणाऱ्या सत्यकथा
राक्षसी कृत्याच्या 7 घटना, 10 जणांनी जीव गमावला; पहलगाम हल्ल्यातील काळीज पिळवटणाऱ्या सत्यकथा
pahalgam terror attack दैव बलवत्तर... अकोल्यातील विशाल अन् पत्नीचा जीव वाचला, पहलगामचा दौरा एक दिवस आधीच उरकला
दैव बलवत्तर... अकोल्यातील विशाल अन् पत्नीचा जीव वाचला, पहलगामचा दौरा एक दिवस आधीच उरकला
उन्हाचा कहर... देशातील सर्वाधित तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर
उन्हाचा कहर... देशातील सर्वाधित तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर
SRH vs MI : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेडसह इशान किशन अन् नितीशकुमार रेड्डी फेल, हैदराबादच्या नवाबांची लाजिरवाणी कामगिरी
हैदराबादचे नवाब फेल, काव्या मारनचा चेहरा पडला, होम ग्राऊंडवर अभिषेक शर्मा ते नितीशकुमार रेड्डी अपयशी
Pahalgam terror attack : पत्नी अन् मुलांना दुसऱ्या दिशेनं पळा म्हणाले अन्.. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आयबी अधिकाऱ्याला सुद्धा पत्नी आणि मुलांसमोर गोळी घातली
पत्नी अन् मुलांना दुसऱ्या दिशेनं पळा म्हणाले अन्.. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आयबी अधिकाऱ्याला सुद्धा पत्नी आणि मुलांसमोर गोळी घातली
मोठी बातमी : एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना, घटनास्थळी जाऊन आढावा घेणार
मोठी बातमी : एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना, घटनास्थळी जाऊन आढावा घेणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल  2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल  2025 | बुधवार
Pahalgam Terror Attack नेव्ही, IB अन् वायू दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू; दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या तीन सुपुत्रांना वीरगती
नेव्ही, IB अन् वायू दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू; दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या तीन सुपुत्रांना वीरगती
Embed widget