एक्स्प्लोर
SRH vs MI : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेडसह इशान किशन अन् नितीशकुमार रेड्डी फेल, हैदराबादच्या नवाबांची लाजिरवाणी कामगिरी
MI vs SRH : हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी फायदेशीर ठरला. हैदराबादचे दिग्गज अपयशी ठरले.
हैदराबादचे नवाब फेल
1/5

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आले आहेत. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकचा हा निर्णय ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरनं सार्थ ठरवला.
2/5

हैदराबादचा संघ ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, ट्रेविस हेड या मॅचमध्ये देखील अपयशी ठरला. तो केवळ 4 धावा करुन बाद झाला. ट्रेंट बोल्टनं त्याला बाद केलं.
3/5

इशान किशनची विकेट मुंबईसाठी गिफ्ट ठरली. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर बॉल बॅटला लागलेला नसताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अपिल करताच त्याला बाद दिलं गेलं. यावर त्यानं डीआरएस घेतला नाही. इशान किशन 1 धाव काढून बाद झाला.
4/5

अभिषेक शर्मानं एक षटकार मारुन इरादे स्पष्ट केले होते. मात्र, तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर तो 8 धावा करुन बाद झाला.
5/5

नितीश कुमार रेड्डी ला दीपक चाहरनं 2 धावांवर असताना बाद केलं. तर, हार्दिक पांड्यानं अनिकेत वर्माला 12 धावांवर बाद केलं. मुंबईच्या टीमनं अवघ्या 35 धावांमध्ये हैदराबादचा संघ तंबूत परत पाठवण्यात यश मिळवलं होतं.
Published at : 23 Apr 2025 08:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
राजकारण



















