एक्स्प्लोर
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; साखर झोपेत असताना अनेकांचे संसार उद्ध्वस्त
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
Pune News
1/6

राज्यभरात उन्हाचा भडका उडाला असतांना आगीच्या घटनेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
2/6

पुढे आलेल्या माहितीनुसार, जवळपास सात ते आठ सिलेंडरचा देखील या आगीत स्फोट झाला आहे. तर नागरिकांच्या रोज वापरतील वस्तुचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
3/6

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
4/6

दरम्यान, अजूनही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशामक विभागाकडून सुरू आहेत.
5/6

पहाटेच्या सुमारास आग लागल्याने अनेक लोक या झोपडपट्टीमध्ये अडकली आहेत. सध्या त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
6/6

मात्र साखर झोपेत असतांना अनेकांना काही कळायच्या आता आगीने भडका घेतल्याने अनेकांची पूर्ती धांधल उडाली आहे.
Published at : 23 Apr 2025 07:40 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
राजकारण
महाराष्ट्र






















