एक्स्प्लोर
अशैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांचं आज शाळा बंद आंदोलन
शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षकांना आर्थिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. संस्थाचालकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्यावतीने शुक्रवारी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केले आहे. आज ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांचे पेपर शनिवारी ठेवण्यात आले आहेत.
मुंबई : गेल्या चार वर्षापासून राज्यभरात संस्थांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या विरोधात राज्यातील अनुदानित संस्थाचालकांनी आज शाळा बंद आंदोलन केले आहे. राज्यातील शिक्षण संस्था तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांनी हे आंदोलन पुकारले आहे.
शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षकांना आर्थिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. संस्थाचालकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्यावतीने शुक्रवारी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केले आहे. आज ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांचे पेपर शनिवारी ठेवण्यात आले आहेत.
वेतनेतर अनुदान, इमारत निधी, वाचनालय, प्रयोगशाळा निधी शासनाने बंद केलेला आहे. यासह पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदी दूर करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सुधारित आकृतीबंध लागू करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे या मागण्यांसाठी हा राज्यव्यापी संप केला जात आहे.
दुसरीकडे उद्या मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच पूर्णवेळ शिक्षण उपसंचालकांची नेमणूक करण्यासाठी व उपसंचालक कार्यालयातील अनागोंदी व भ्रष्ट कारभाराविरोधात आझाद मैदान शुक्रवारी दुपारी 2 ते 4 धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement