(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला अभिवादन
कशेडी घाटात ट्रॅव्हल्स 20 फुट दरीत कोसळली, आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, काही प्रवाशी जखमी सावधान...! यंदा थर्टी फस्टला दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची ब्लड टेस्ट, सहकाऱ्यांवरही गुन्हा! संजय राऊत यांच्याकडे असलेली भाजपच्या 120 लोकांची यादी ईडीला सोपवावी : रामदास आठवले गोंधळून जाऊ नका! देशभरात नवीन वर्षापासून फॉस्टॅग अनिवार्य, मुंबईत मात्र 26 जानेवारीपर्यंत मुभा देशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Coronavirus | कोरोनाचे बदलते प्रकार लसीचा प्रभाव कमी करणार नाहीत : आरोग्य मंत्रालय
पहिल्या कोरोना व्हायरसचं संकट टळत नाही तोच जगातील काही राष्ट्रांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. मुख्य म्हणजे याचा संसर्ग पसरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वत्र सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. असं असतानाच पहिल्या प्रकारच्या कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून विकसित करण्यात आलेली लस ही दुसऱ्या व्हॅरिएंटच्या बाबतीत कमी प्रभावी किंवा अकार्यक्षम असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली. सध्याच्या लसी या नव्या प्रकारापासून रुग्णांचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा कोणताही पुरावा युके, दक्षिण आफ्रिका अशा राष्ट्रांकडून देण्यात आलेला नाही, असं प्रिन्सिपल साइंटीफिक के. विजय राघवन यांनी सांगितलं.
ब्रिटन, अमेरिका आणि युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा : राजेश टोपे
ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात कुठेही नवीन विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारत-इंग्लंड दरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाचे संकेत
ब्रिटनहून भारतात परत आलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (स्ट्रेन) आढळला आहे. दरम्यान, विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत सांगितलं की, भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती थोडीशी वाढवावी लागेल. पुढील एक-दोन दिवसात आम्हाला अतिरिक्त पावले उचलण्याची गरज आहे की नाही किंवा तात्पुरती निलंबन शिथिल करण्यास सुरवात केव्हा होईल हे आम्हाला कळेल. नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) लक्षात घेता 23 ते 31 डिसेंबर दरम्यान इंग्लंड ते भारत उड्डाणे रद्द केली होती. आता 31 डिसेंबरनंतरही उड्डाणे रद्द केली जाऊ शकतात, असं हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं. ब्रिटनमध्ये आढळणारा हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरतो आणि तो अतिसंसर्गजन्य आहे.
ठाण्यात ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी सहप्रवाशांवरही कारवाई होणार!
2020 या वर्षाला गुड बाय करुन 2021 या नववर्षाचे स्वागत काही तासांवर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट झाले असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे 415 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.