एक्स्प्लोर

Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता

अकोला जिल्हा परिषदेवर परत प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आंबेडकरांची अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारिप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपल्या जागा वाढविल्या आहे

अकोला : अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण एकूण 53 जागांपैकी वंचितने 22 जागांवर बाजी मारली आहे. बहुमतासाठी त्यांना 5 जागांची गरज असून चार अपक्ष वंचितला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. या चार पैकी दोघे जण भारिपचे बंडखोर आहे तर एक जण भारिप समर्थक आहेत. अर्थात वंचितला बहुमतासाठी एक जागेची गरज आहे. त्यामुळं बहुमत गाठण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना कुणाची साथ मिळते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसोबडे गावात वंचितनं बाजी मारली आहे. अकोला जिल्हा परिषदेवर परत प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आंबेडकरांची अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारिप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपल्या जागा वाढविल्या आहे. तर जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदार असणाऱ्या भाजपच्या जागा अकरावरून सातवर आल्या आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे केंद्रात राज्यमंत्री आहे. विजयी झालेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये भारिपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेनेचे उपजजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकरांचा समावेश आहे. तर प्रमुख पराभूतांमध्ये वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू ढोरे यांच्या पत्नीचा समावेश आहे. Akola ZP Election | अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित आघाडीची सत्तेकडे वाटचाल | ABP Majha केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकरांचं गाव असणाऱ्या पळसोबडे गावातून भारिपच्या उमेदवारांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेल्या दगडपारव्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. तर चोहोट्टाबाजार येथे भारिपचा उमेदवार विजयी झाला आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ भारिपनं सातपैकी सर्वाधिक पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन केली आहे. सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीवर भारिपनं स्पष्ट बहुमत मिळवल आहे. यासोबतच बाळापूर, तेल्हारा आणि अकोट पंचायत समितीही भारिपच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेनं पातूर पंचायत समितीवर सत्ता राखली आहे. तर त्रिशंकू असलेल्या मुर्तिजापूरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता आहे. एकूण जागा : 53 
शिवसेना -12
भारिप - 22
भाजप - 07
राष्ट्रवादी - 03
काँग्रेस - 05
अपक्ष - 04
संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget